दौंड : वर्दीतील पोलिसाची अशी अनोखी रूग्ण सेवा

रुग्णांना दोन वेळेचा सकस नाश्ता, पौष्टीक जेवण, हळदीचे दूध, ड्रायफ्रूट, फळे, चिकन, अंडी असा आहार
police
police Sakal Media

केडगाव (पुणे) ः अवघे गरजे पंढरपूर...चालला नामाचा गजर... हा आवाज मंदिरामध्ये घुमत नसून चक्क हा आवाज सध्या कोव्हिड केअर सेंटर मध्ये घुमू लागला आहे. आमदार राहुल कुल यांनी देऊळगावगाडा (ता. दौंड) येथे आमदार निधीतून कोविड सेंटर सुरू केले आहे. येथील रूग्णांच्या मनोरंजनासाठी दररोज विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. सुश्राव्य भजनामुळे रुग्ण, डॅाक्टर, कर्मचा-यांनी समाधान व्यक्त केले आहे.

भजनात पारंगत असलेले पोलिस कर्मचारी मल्हारी सोडनवर व त्यांच्या सहकार्यांनी भजन संध्याचा कार्यक्रम केला. कोविड सेंटरमधील रूग्णांनी खड्या आवाजातील भजनाचा आनंद घेतला. पोलिस खात्यात असूनही उत्कृष्ठ भजन सेवा केल्याबद्दल त्यांचा आमदार कुल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सोडनवर व त्यांच्या सहकार्यांनी पारनेर तालुक्यात आमदार नीलेश लंके यांनी सुरू केलेल्या कोविड सेंटरमध्ये भजन सेवा सादर केली आहे. दौंड तालुक्यातील बोरीपार्धी येथील सोडनवर हे सध्या यवत पोलिस स्टेशनमध्ये सेवेत आहेत. दत्त सेवा मंडळाच्या माध्यमातून ग्रामस्थांना बरोबर घेऊन ते विधायक कामे करत असतात.

भजन गायक मल्हारी सोडनवर यांना वादक दिनकर देवडकर, निखील ताकभाते, संतोष खणसे, कृष्णा व्यवहारे, दादा नेवसे, सतीश सोडनवर, सुनील माने, विजय टेंगले, नीलेश ताडगे, संदीप सोडनवर, सुदर्शन होळकर, अनिकेत टेंगले यांनी भजनाची साथ केली. यावेळी काही रूग्णांनी भजनावर ठेका धरत नृत्य केले. यावेळी आमदार राहुल कुल यांच्याकडून स्वर साधना भजन संध्या ग्रुपला ११ हजार रूपयांची देणगी देण्यात आली मात्र ग्रुपने ही देणगी देऊळगाव गाडा कोविड सेंटरला मदत म्हणून ती परत केली. असे मल्हारी सोडनवर यांनी सांगितले.

देऊळगावगाडा केंद्रात १०० ऑक्सिजन खाटांची सोय आहे. या केंद्रात सध्या ४८ रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत तर १०५ रुग्ण विलगिकरनात राहून उपचार घेत आहेत. मागील आठवड्यात सुमारे १८६ रुग्णांना उपचार मिळाले आहेत. कोरोना महामारीच्या काळात रुग्णांना गरज आहे ती मानसिक आधाराची. आमदार राहुल कुल हे दररोज या सेंटरमध्ये येऊन तेथील रुग्णांना आधार देण्याचे काम करीत आहेत. या सेंटरमध्ये उपचार घेऊन बरे झालेल्या २८ रुग्णांना आमदार कुल यांनी गुलाब पुष्प देऊन निरोप दिला. रुग्णांना पुरविण्यात येणाऱ्या सर्व सुविधा मोफत असून देखील दर्जेदार असाव्यात यासाठी आमदार कुल व त्यांचे सहकारी आग्रही आहेत. रुग्णांना दोन वेळेचा सकस नाश्ता, पौष्टीक जेवण, हळदीचे दूध, ड्रायफ्रूट, फळे, चिकन, अंडी असा आहार दिला जात आहे. त्याचबरोबर सेंटर मधील स्वच्छता, आवश्यक वैद्यकीय सुविधा, औषधे देण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com