...म्हणून त्यांनी त्या मुलाचा खून केला; पोलिसांकडून चौघांना अटक

crime.jpg
crime.jpg

पुणे : पैसे न दिल्याच्या कारणावरुन  शिवीगाळ केल्यामुळे एका अल्पवयीन मुलाच्या खूनाचा प्रकार नुकताच घडला होता. या घटनेची गांभीर्याने दखल घेत कोंढवा पोलिसांनी चार आरोपीला बेडया ठोकल्या.
 
रोहित गौतम बनसोडे (वय 27, रा.उंड्री),  अजय विजय गायकवाड (वय 22), श्रीकांत भिमराव साठे (वय 20, दोघेही रा.महमंदवाडी) अक्षय अनिल जाधव (वय 20, रा. वानवडी) अशी अटक केलेल्या संशयित आरोपीची नावे आहेत. या गुन्ह्यात रोहन सिंग, सतीश गायकवाड फरारी आहेत. तर अझान जहीर अन्सारी (वय 12) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे.

कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा खुर्द येथील अझान अन्सारी या मुलाचे नऊ जुलै रोजी अपहरण झाले होते. तर दहा जुलै रोजी त्याचा मृतदेह जंगलात आढळला. कोंढवा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. त्यावेळी  एक सीसीटिव्ही चित्रीकरणामध्ये दोघेजण संबंधीत मुलाला दुचाकीवर घेऊन जाताना दिसत होते. दुचाकीचा क्रमांक अस्पष्ट दिसत होता. 

"श्री" अक्षराने तपासाला दिली दिशा- दरम्यान, दुचाकीवर श्री अक्षर लिहिल्याचे पोलिसांना दिसले. तर कृष्णानगरमध्ये राहणार्‍या रोशन सिंगच्या घरासमोर नंबर प्लेट नसलेली दुचाकी लावली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तपास केला, त्यावेळी रोशन सिंगच्या गाडीवर ‘श्री’ अक्षर असल्याचेही पोलिसांना दिसले. पोलिसांनी संशयावरुन रोशन सिंगला ताब्यात घेतले. त्यावेळी त्याने गुन्हा केल्याचे सांगून इतर चौघांचाही गुन्ह्यात सहभाग असल्याचे सांगितले. त्यांची चौकशी केल्यानंतर रोहन सिंग व रोहित बनसोडे यांनी सतीश गायकवाड याच्या सांगण्यावरून संबंधीत मुलाला आठ जुलै रोजी दुपारी तीन वाजता कोंढवा येथील गोल्डन बेकरी येथे भेटण्यासाठी बोलावले. तेथून ते त्याला सतीश गायकवाड सोबत हेवन पार्कच्या मागील बाजूस असलेल्या जंगलात घेऊन गेले. तेथे सर्वानी त्याला दारू पाजून त्याचा दगडाने ठेचून खून केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड, गुन्हे निरीक्षक महादेव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक चेतन मोरे, संतोष नाईक, सुशील धिवार व निलेश वणवे यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

म्हणून केला खून- रोशन सिंग याच्या पान टपरीवर अल्पवयीन मुलगा त्याला पैसे मागायला गेला होता. रोशनने त्यास पैसे न दिल्याने मुलाने त्यास मुले आणून मारण्याची व टपरी तोडण्याची धमकी दिली होती. रोशनने हा सर्व प्रकार त्याचा भाऊ रोहन सिंग याला फोन करून सांगितल्यानंतर खुनाचा प्रकार घडला. अल्पवयीन मुलाच्या नावावर देखील चोरी, घरफोडीचे गुन्हे दाखल होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com