Pune News : पुण्यात महिलेवर पाळत ठेवणारे दोन गुप्तहेर अटकेत; नेमकं कारण काय? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Police arrested 2 private detectives who were monitoring a woman in Pune

Pune News : पुण्यात महिलेवर पाळत ठेवणारे दोन गुप्तहेर अटकेत; नेमकं कारण काय?

पुणे : आरोग्य सल्लागार असलेल्या महिलेवर पाळत ठेवुन तिची गुप्त माहिती काढणार्‍या दोन खाजगी गुप्तहेरांनागुन्हे पोलिसांच्या शाखा 2 च्या पथकाने अटक केली आहे. कोरेगाव पार्क परिसरातून या गुप्तहेरांना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निलेश लक्ष्मणसिंग परदेशी (२५, रा. वडगाव मावळ, जि. पुणे) आणि राहुल गुणवंतराव बिरादार (30, रा. देहुगाव ता. मावळ) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. कोरेगाव पार्क परिसरात राहणार्‍या एका 32 वर्षीय महिलेने कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात याबद्दल फिर्याद दिली आहे.

हेही वाचा: Pune Sextortion : पुण्यात तिशीतल्या तरूणाचं सेक्सटॉर्शन; आत्महत्या करेन म्हणत उकळले पैसे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला ही आरोग्य सल्लागार आहे. तिचे परदेशात शिक्षण झाले असून ती सध्या पुण्यात वास्तव्यास आहे. सध्या या दोन्ही आरोपींची चौकशी सुरू आहे. नेमके महिलेवर पाळत ठेवण्यासाठी कोणी सांगितले होते, त्यामागचे नेमके काय कारण आहे, याबाबत आमचा तपास सुरू आहे. लवकरच याचे कारण समोर येईल अशी माहिती देण्यात आली आहे.

हेही वाचा: Ind vs Sl : 'इशान तुझा करुण नायर झाला…' द्विशतकानंतरही पहिल्या वन-डेतून बाहेर

टॅग्स :Pune Newscrime