पोलिस कोठडीतून पळालेला "तो' आरोपी जेरबंद 

पोलिस कोठडीतून पळालेला "तो' आरोपी जेरबंद 

पुणे - पोलिस कोठडीत असताना कमलनयन रुग्णालयातून पलायन केलेल्या आरोपीस खडक पोलिसांनी मुंबई येथून जेरबंद केले. पळून गेल्यापासून तो सातत्याने मुंबई ते पुणे या दरम्यान भटकत होता. अनुराग कमलेश भाटिया (वय 23, रा. कृष्णकमल सोसायटी, सूस-पाषाण रोड) याला 19 सप्टेंबर रोजी अटक केली होती. त्याची 25 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी होती. आरोपीने शौचालयाला जाण्याचा बहाणा करून 23 सप्टेंबर रोजी शुक्रवार पेठ येथील कमलनयन हॉस्पिटलच्या खिडकीतून पळ काढला होता. 

आरोपी पळून गेल्यानंतर त्याचा खडक पोलिसांनी प्रथम पुणे व नंतर माहितीनुसार मुंबई येथे जाऊन गेले चार दिवस सतत पाठलाग सुरू ठेवला होता. आरोपी, नवीन मोबाईल घेऊन कुठेही मुक्‍काम न करता किंवा न थांबता सतत पुणे- मुंबई- पुणे असा फिरत होता. मुंबई पोलिस भोईवाडा पोलिस स्टेशन डीबी पथक व गुन्हे युनिट - चार यांच्या मदतीने शुक्रवारी मुंबई (परळ) येथे आरोपीला पकडल्याची माहिती खडक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिली. आरोपी भाटिया याची एका वाहनाच्या शोरूमचालकाशी दोन वर्षांपूर्वी ओळख झाली होती. त्यांच्यामध्ये अनैसर्गिक समलिंगी संबंध होते. घटनेच्या दिवशी फिर्यादी झोपला असता अनुरागने त्याच्यावर कोयत्याने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तो अटकेत होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com