लाखोंचा गंडा घालणारा पाच वर्षांनी जाळ्यात

लाखोंचा गंडा घालणारा पाच वर्षांनी जाळ्यात

पुणे - गुंतवणुकीवर दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून अनेक नागरिकांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या आरोपीस पकडण्यात गुन्हे शाखेच्या युनिट तीनला यश आले आहे. तो मागील पाच वर्षांपासून फरारी होता. 

वसंत गोविंद भालवणकर (वय ५३, रा. फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर फसवणूकप्रकरणी २०१४ मध्ये डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. भालवणकर याने पाच वर्षांपूर्वी फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता परिसरात स्वतःची ओमेगा आय ट्रेड इंडस्ट्रीज नावाची एक कंपनी सुरू केली. त्याने ग्रामीण भागातील जमिनीमध्ये गुंतवणूक केल्यास दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून अनेक जणांकडून लाखो रुपये उकळले. पैसे मागण्यासाठी आलेल्या नागरिकांना त्याने धमकाविण्यासह मारहाणही केली होती. या स्वरूपाचे गुन्हे अलंकार पोलिस ठाण्यात दाखल आहेत. याचबरोबर शिवाजीनगर न्यायालयामध्येही त्याच्याविरुद्ध धनादेश न वटण्याची दहा ते १५ प्रकरणे प्रलंबित  आहेत. 

दरम्यान, डेक्कन येथे दाखल आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी बाणेरमधील महाबळेश्‍वर हॉटेलजवळ थांबला असल्याची खबर पोलिस उपनिरीक्षक किरण अडागळे यांना मिळाली. पथकाने सापळा रचून त्यास ताब्यात घेतले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com