PMPML Bus : पीएमपी बसमध्ये महिलांचे दागिने चोरणाऱ्यास अटक

आरोपींना शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले
police arrested for stealing women jewelery in pmpml bus pune crime
police arrested for stealing women jewelery in pmpml bus pune crimeesakal

पुणे : पीएमपी बसमध्ये महिलांच्या सोन्याच्या बांगड्या चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने अटक केली. आरोपींच्या ताब्यातून २५ ग्रॅम वजनाची सोन्याची पाटली आणि कटर असा मुद्देमाल जप्त केला आहे.

संतोष ऊर्फ मॅनेजर शरणप्पा जाधव (वय ४१, रा. मांजरी बुद्रूक, हडपसर मूळ रा. कर्नाटक) आणि सुधीर ऊर्फ तुंड्या नागनाथ जाधव (वय ४५, रा. शास्त्रीनगर, अंबरनाथ, जि. ठाणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

महिलांच्या सोन्याच्या बांगड्या कटरने तोडून चोरी करणारा सराईत गुन्हेगार संतोष जाधव आणि त्याचा साथीदार कोरेगाव पार्क परिसरातील एका चहाच्या हॉटेलजवळ असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक इंदलकर यांच्या पथकाने आरोपींना अटक केली. आरोपींना शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com