सहायक पोलिस उपनिरीक्षकास लाच घेताना अटक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 नोव्हेंबर 2016

पुणे - शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस उपनिरीक्षकास चार हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अटक केली.
याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे - शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस उपनिरीक्षकास चार हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अटक केली.
याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजू भास्कर सोनुले असे त्या सहायक उपनिरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी तक्रार दिलेल्या व्यक्‍तीचा ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. त्यांच्या चालकाकडून वाहनाचा अपघात झाला होता. या गुन्ह्यात मदत करण्यासाठी शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील राजू सोनुले याने तक्रारदाराकडे चार हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यावर संबंधित तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या कार्यालयात संपर्क साधला. याप्रकरणी पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या सूचनेनुसार सापळा रचून सोनुले याला ताब्यात घेतले.

Web Title: Police arrested PSI

टॅग्स