जुगार अड्ड्यावरील छाप्यात पोलिसच जेरबंद

प्रफुल्ल भंडारी
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

दौंड शहरातील एका वातानुकूलित जुगार अड्ड्यावर पोलिसांनी कारवाईसाठी छापा टाकला. या वेळी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये राज्य राखीव पोलिस दलाचे (एसआरपीएफ) दोन जवान निघाले. 

दौड (पुणे) : दौंड शहरातील एका वातानुकूलित जुगार अड्ड्यावर पोलिसांनी कारवाईसाठी छापा टाकला. या वेळी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये राज्य राखीव पोलिस दलाचे (एसआरपीएफ) दोन जवान निघाले. या वेळी पोलिसांनी कारवाई करत 1 लाखाच्या रोकडसह एकूण 2 लाख 32 हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त केला.

याबाबत दौंड पोलिस ठाण्याचे अंमलदार गोपाळ ओमासे यांनी माहिती दिली की, दौंड शहरातील नदीकाठच्या इंदिरानगरमध्ये इक्‍बाल बाबूमिया शेख याचा वातानुकूलित जुगार अड्डा आहे. त्याच्यावर अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयंत मीना यांनी आज संध्याकाळी सहा वाजता पथकासह छापा टाकला. या छाप्यात 1 लाख 16 हजार रुपयांची रोकड, 10 मोबाईल संच, जुगाराचे साहित्य, असा एकूण 2 लाख 12 हजार 730 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी 14 जणांना ताब्यात घेतले आहे. त्यात राज्य राखीव पोलिस दलाचे (एसआरपीएफ) दोन जवान निघाले. 

बारामती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, यवतचे (ता. दौंड) सहायक पोलिस निरीक्षक धनंजय कापरे आदींनी या कारवाईत भाग घेतला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police arrested in raid on gambling base