हौसेसाठी पिस्तुल बाळगणाऱ्या तरुणास अटक 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जुलै 2018

पुणे : प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारची हौस असते, मात्र जनता वसाहतीमधील एका तरुणाला चक्क पिस्तूल जवळ बाळगण्याची हौस होती. त्यानुसार त्याने आपल्याजवळ 25 हजार रुपये किमतीचे पिस्तूल बाळगलेही. ही खबर दत्तवाडी पोलिसांपर्यंत पोचली, त्यांनीही क्षणाचाही विलंब न लावता त्यास ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्‍या दाखविताच क्षणार्धात त्याची हौसही फिटली. 

अभिषेक दीपक दीक्षित (वय 25, रा. जनता वसाहत) असे पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाचे नाव आहे. दत्तवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी सुधीर घोटकुले यांना, सोमवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास एक तरुण पर्वती दर्शन येथे संशयास्पदरीत्या फिरत असून त्याच्याकडे बंदुकीसारखे हत्यार असल्याची खबर मिळाली. याबाबतची माहिती घोटकुले यांनी पोलिस निरीक्षक देविदास घेवारे यांना दिली. त्यानुसार परिमंडळ दोनच्या पोलिस उपायुक्त ज्योतीप्रिया सिंह, सहाय्यक पोलिस आयुक्त शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली घेवारे, पोलिस उपनिरीक्षक अनिल डफळ, महेश गाढवे, तानाजी निकम, रविंद्र फुलपगारे, रोहन खैरे, सागर सुतकर, विकास कदम, शिवाजी क्षीरसागर व राहुल ओलेकर यांच्या पथकाने सापळा रचला.

लक्ष्मी नारायण चित्रपटगृहाजवळील जय भवानी हॉटेलसमोरुन संबंधित तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून गावठी बनावटीची 25 हजार रुपये किमतीची एक पिस्तूल व एक जिवंत काडतूस ताब्यात घेतले.

Web Title: police arrested a youth with pistol