पोलिस म्हणतात, अवैध धंदे नाहीतच!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जुलै 2018

पुणे - जुगार, मटका, हातभट्टी दारू यांसारखे अवैध व्यवसाय सुरू असतानाही ‘आमच्याकडे अवैध धंदे चालत नाहीत,’ असा दावा मार्केट यार्ड व सहकारनगर पोलिस ठाण्याने केला आहे. ‘आपण अवैध धंदे बंद केले आहेत,’ असे स्पष्टीकरण दत्तवाडी व भारती विद्यापीठ पोलिसांनी माहिती अधिकाराअंतर्गत विचारलेल्या प्रश्‍नावर दिले आहे. 

मार्केट यार्ड, सहकारनगर, दत्तवाडी व भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीमधील अवैध धंद्यांच्या स्थितीबाबतची माहिती एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने मागविली होती. त्यामध्ये चारही पोलिस ठाण्यांनी आपल्याकडील अवैध व्यवसाय बंद केल्याचे नमूद केले आहे. 

दरम्यान, संबंधित पोलिस ठाण्यांच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांबाबत या परिसरातील नागरिकांनीच ‘सकाळ’कडे तक्रार केली. मार्केट यार्डमधील फुलबाजार, धान्य बाजार येथे मटका, तर सहकारनगरमधील मोरे वस्ती येथे जुगार, मटका सुरू असल्याचे नागरिकांनी सांगितले. गेल्या अनेक महिन्यांपासून हे धंदे सर्रासपणे सुरू आहेत.

पोलिसांनी माहिती अधिकाराअंतर्गत दिलेली माहिती  
पोलिस     कारवाई         ठाणे    (दिलेल्या कालावधीत)

भारती विद्यापीठ     ४ ठिकाणी
दत्तवाडी     ३ ठिकाणी
मार्केट यार्ड    अवैध धंदे नाहीत
सहकारनगर    अवैध धंदे नाहीत

अवैध व्यवसायांवर नियंत्रण आणण्याचे काम संबंधित पोलिस ठाण्यांनी केले आहे. त्यानंतरही असे व्यवसाय सुरू असतील, तर संबंधित पोलिस ठाण्यांना त्यांच्यावर कारवाई करण्यास सांगितले जाईल. 
- शिवाजी पवार, सहायक पोलिस आयुक्त, स्वारगेट विभाग.

Web Title: police black market crime