पोलिस कर्मचाऱ्याला लाच घेताना पकडले 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 मे 2018

पुणे - रात्री उशिरपर्यंत हॉटेल सुरू ठेवण्यासाठी व्यावसायिकाकडून आठ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. कोंढवा येथील एका हॉटेलमध्ये ही कारवाई करण्यात आली. 

वैभव चंद्रकांत बनकर (वय 28) असे लाच घेणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून, तो कोंढवा पोलिस ठाण्यामध्ये नेमणुकीस आहे. तक्रारदार यांचे कोंढव्यातील कडनगर चौकात हॉटेल आहे. हॉटेलमध्ये ग्राहकांची गर्दी झाल्यास रात्री हॉटेल बंद करण्यास उशीर होतो. हॉटेल उशिरापर्यंत सुरू ठेवण्यास पोलिसांकडून मज्जाव केला जातो. हॉटेल उशिरापर्यंत सुरू ठेवण्यासाठी बनकरने हॉटेल मालकास आठ हजार रुपयांची लाच मागितली होती. संबंधित पोलिसाकडून होणाऱ्या या अन्यायाविरुद्ध हॉटेल मालकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार लाचलुचपत विभागाचे पोलिस अधीक्षक संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक अशोक शिर्के, पोलिस निरीक्षक जालिंदर तांदळे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने शनिवारी रात्री पावणे अकरा वाजता संबंधित तक्रारदाराच्या हॉटेलमध्ये सापळा रचून बनकरला ताब्यात घेतले. 

Web Title: police caught while taking a bribe