डीएसकेंच्या दोन नातेवाइकांसह चौघांच्या कोठडीत वाढ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 मे 2018

पुणे - ठेवीदारांच्या फसवणूकप्रकरणी अटकेत असलेले बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या दोन नातेवाइकांसह दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पोलिस कोठडीमध्ये वाढ करण्यात आली आहे. 29 मेपर्यंत त्यांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने केदार वांजपे, सई वांजपे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी धनंजय पांचपोर या तिघांना 16 मे रोजी, तर विनय बडगंडी यांना दुसऱ्या दिवशी अटक करण्यात आली होती. त्यांना न्यायालयाने 25 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. दरम्यान, पोलिसांनी शुक्रवारी चौघांनाही न्यायालयासमोर हजर केले. पोलिसांनी अधिक चौकशीसाठी आरोपींसाठी चार दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली. त्यानुसार न्यायाधीश जे. टी. उत्पात यांनी 29 मेपर्यंत पोलिस कोठडीत वाढ केली. दररोज दुपारी चार ते सहा या वेळेत आरोपींना वकिलांना भेटण्याची परवानगीही दिली. पोलिसांतर्फे ऍड. प्रवीण चव्हाण व तपास अधिकारी सहायक पोलिस आयुक्‍त नीलेश मोरे यांनी आपली बाजू मांडली, तर आरोपींतर्फे ऍड. हर्षद निंबाळकर, ऍड. शैलेश म्हस्के, ऍड. प्रसाद कुलकर्णी व ऍड. नंदू फडके यांनी युक्तिवाद केला.

Web Title: police custody dsk two relatives crime