मतमोजणी केंद्राबाहेर कडेकोट बंदोबस्त 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांतील मतमोजणीकडे सर्वांचेच लक्ष लागलेले असताना, पुणे पोलिसांनी कोरेगाव पार्क येथील मतमोजणी केंद्राबाहेर कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.

पुणे - पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांतील मतमोजणीकडे सर्वांचेच लक्ष लागलेले असताना, पुणे पोलिसांनी कोरेगाव पार्क येथील मतमोजणी केंद्राबाहेर कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. गोंधळ झाल्यास तेथील परिस्थिती हताळण्यासाठी निमलष्करी दल, एसआरपीएफच्या तुकड्याही तैनात आहेत. संपूर्ण शहरातही बंदोबस्त आहे. विजयी होणाऱ्या उमेदवारांना मिरवणूक काढता येणार नाही, असे पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी सांगितले. 

गुरुवारी सकाळी आठ वाजता कोरेगाव पार्क येथील धान्य गोदाम येथे मतमोजणी सुरू होईल. सोमवारी (ता. 21) मतदान झाल्यानंतर आठही विधानसभा मतदारसंघांतील ईव्हीएम मशीन याच गोदामांमध्ये ठेवण्यात आले आहेत. त्यासाठीही परिसरात कडेकोट बंदोबस्त आहे. मतमोजणीच्या दिवशी उमेदवार, कार्यकर्ते मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी मोठी गर्दी करतात, जो उमेदवार आघाडीवर असतो त्याचे कार्यकर्ते घोषणाबाजी करतात. त्यातून वादाची स्थिती निर्माण होते. त्यामुळे कोरेगाव पार्क गोदाम परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात आहे. येथे साध्या गणवेशातील पोलिसही तैनात असणार आहेत. 

उमेदवारांची कचेरी, पक्षाचे कार्यालय, महत्त्वाचे चौक, संवेदनशील भागांत पोलिसांचा बंदोबस्त आहे. शहरात जमावबंदीचे 144 कलम लागू करण्यात आल्याचे शिसवे यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police deployed outside the counting center

टॅग्स