व्हॉट्‌सॲपद्वारे पोलिसांशी संवाद

संदीप घिसे
शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019

पिंपरी - वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वेगवेगळ्या सोसायट्यांमधील महिलांनी व्हॉट्‌सॲप ग्रुप तयार केले आहेत. त्यात पोलिस अधिकाऱ्यांनाही समाविष्ट केले. त्यामुळे दोन हजारांहून अधिक महिला त्यांच्या संपर्कात आहेत. या महिला छेडछाड, अवैध धंदे किंवा इतर माहिती महिला व्हॉट्‌सॲपद्वारे पोलिसांना देतात. त्यावर पोलिस कार्यवाही करतात. 

हिंजवडीतील आयटी क्षेत्रात काम करणारे बहुतांश वाकड परिसरात राहतात. सोसायट्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीत साडेतीनशे सोसायटी आहेत. 

तोतया पोलिसांच्या ताब्यात
काळेवाडी फाटा येथील एक तरुणी मध्यरात्री घरी येताना एका तरुणाने तिला अडविले. पोलिस असल्याचे सांगून तिच्या दुचाकीची झडती घेतली. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने तिने सोसायटीच्या ग्रुपवर सांगितले. या माहितीची दखल घेत सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिसांनी संबंधित तरुणाला शोधून काढले. लेखी तक्रार नसल्याने त्या तरुणाकडून लेखी जबाब घेऊन समज देऊन सोडून दिले. 

पोलिसांकडून सूचना
वाकड तसेच परिसरात मंगळसूत्र चोरीची घटना घडल्यास पोलिस या व्हॉट्‌ॲपच्या ग्रुपवर मेसेज टाकतात. यामुळे महिला स्वतः सावध होतात आणि आपल्या मैत्रिणींना याबाबत सावध करतात. तसेच घरफोड्या होऊ नये म्हणून पोलिस या व्हॉट्‌सॲप ग्रुपच्या माध्यमातून सूचना देतात.

गॅरेजवाल्यांचाही ग्रुप
चोरीचे मोबाईल किंवा वाहने विक्रीसाठी चोरटे दुकानदाराच्या नकळत त्यांची मदत घेतात. वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मोबाईल विक्रेते आणि दुरुस्त करणारे तसेच जुने वाहन विक्रेते आणि दुरुस्त करणारे यांचेही ग्रुप पोलिसांनी तयार केले आहेत. दुकानदारांनी कोणती काळजी घ्यावी, याबाबत ते माहिती देतात.

व्हॉट्‌सॲप ग्रुपच्या माध्यमातून परिसरात घडणाऱ्या घटनांची माहिती मिळते. येथील गुन्हेगारी कमी करण्यासाठी सोशल मीडियाची मदत होते. वाकड पोलिसांनी दहा ग्रुप स्थापन केले असून, दिवसेंदिवस या ग्रुपमध्ये येणाऱ्या महिलांची संख्या वाढत चालली आहे.
- सतीश माने, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाकड पोलिस ठाणे

Web Title: Police Discussion with Whatsapp