Lok Sabha Poll : लोकसभा निवडणूकीसाठी जिल्हा पोलिस सज्ज- पंकज देशमुख

आगामी लोकसभा निवडणूक निर्भय व निष्पक्ष वातावरणात पार पडावी या साठी जिल्हा पोलिसांनी कंबर कसली असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली.
Lok Sabha Poll
Lok Sabha PollSakal

बारामती : आगामी लोकसभा निवडणूक निर्भय व निष्पक्ष वातावरणात पार पडावी या साठी जिल्हा पोलिसांनी कंबर कसली असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली.

बारामतीत ते पत्रकारांशी बोलत होते. अतिरिक्त पोलिस अधीक्षक संजय जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड, पोलिस निरिक्षक संतोष घोळवे, चंद्रशेखर यादव, सहायक पोलिस निरिक्षक राहुल घुगे या प्रसंगी उपस्थित होते.

देशमुख म्हणाले, सर्वच मतदारसंघातील पोलिस बंदोबस्त, संवेदनशील मतदान केंद्र व इतर बाबींचा आढावा घेतला जात आहे. पोलिसांच्या मदतीसाठी इतर राखीव दलांच्या जवानांच्या मदतीचा प्रस्तावही पोलिस महासंचालकांकडे पाठविण्यात येत आहे. केंद्रीय यंत्रणांच्या जवानांची एक तुकडी आली होती, तेव्हा तिची मदत घेण्यात आली.

प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासह अवैध व्यवसायांवरही कारवाई सुरु आहे. आंतरजिल्हा पोलिस तपासणी केंद्र उभारण्यात आली असून पुणे जिल्ह्याच्या हद्दीवर वाहनांची नियमित तपासणी सुरु आहे. मतदान प्रक्रीयेत बाधा आणतील अशा घटकांवर पोलिस कठोर कारवाई करतील.

इतर यंत्रणांसमवेतही पोलिसांची समन्वय असून कायदा व सुव्यवस्था कायम असेल याची काळजी यंत्रणा घेईल. मतदान किंवा निवडणूक प्रक्रीयेत कोणीही बाधा आणली तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. मतदान केंद्राची पाहणी व पुरेसा बंदोबस्त याचेही नियोजन सुरु आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com