esakal | मारटकर खून प्रकरण : हत्यारे पुरविणाऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात; मारेकऱ्यांना दिले होते कोयते
sakal

बोलून बातमी शोधा

Deepak_Maratkar_Shivsena

अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी वाघेल या विरोधात यापूर्वी समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तो शस्त्र पुरवठा करण्यामध्ये सराईत असून संघटित गुन्हेगारी टोळ्यांशी त्याचा संबंध आहे.

मारटकर खून प्रकरण : हत्यारे पुरविणाऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात; मारेकऱ्यांना दिले होते कोयते

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : युवा सेनेचे पदाधिकारी दीपक मारटकर यांच्या खुनासाठी चंद्रशेखर वाघेल याने सनी कोलते याला तीन कोयत्यांची विक्री केली होती. त्यासाठी त्याने दहा हजार रुपये घेतले होते. वाघेल हा गुन्हेगारी टोळ्यांशी संबंधितांना शस्त्र पुरवठा करण्याचे काम करीत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे, अशी माहिती सहायक सरकारी वकील सुरेखा क्षीरसागर यांनी गुरुवारी (ता.८) न्यायालयास दिली.

अॅड. सदावर्ते यांच्या पुतळ्याला चपलांचा हार; छावा संघटनेचं पुण्यात आंदोलन​

अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी वाघेल या विरोधात यापूर्वी समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तो शस्त्र पुरवठा करण्यामध्ये सराईत असून संघटित गुन्हेगारी टोळ्यांशी त्याचा संबंध आहे. गुन्ह्यात वापरण्यात आलेली हत्यारे त्याने कोठून मिळविली. त्याची आणि सनी याची ओळख कशी झाली याबाबत सखोल तपास करायचा असल्याने ऍड. क्षीरसागर यांनी त्याच्या पोलिस कोठडीची मागणी केली. त्यानुसार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. के. बाफना-भळगट यांनी वाघेल (वय 32, रा. 2/2 सीजीएचएस क्वॉटर्स, मुकुंदनगर) यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

पुणे जिल्ह्यात सिंघमने अवैध व्यवसायांवर फास आवळला; बारामतीमध्ये मोठी कारवाई

मारटकर यांच्या खुनाच्या गुन्ह्यात आत्तापर्यंत दहा जणांना अटक करण्यात आली आहे. यापूर्वी अटक करण्यात आलेल्या आरोपींना शुक्रवारपर्यंत (ता.9) पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर, स्वप्नील ऊर्फ चॉकलेट मोडवे याचा पोलिस शोध घेत आहेत. राजकीय वादाच्या कारणावरून राग मनात धरून अटक आरोपी आणि त्याच्या साथीदारांनी मारटकर यांचा शुक्रवारी (ता. 2) धारदार हत्याराने वार करीत खून केला. या प्रकरणी राहुल भगवान आलमखाने (वय 43, रा. बुधवार पेठ) यांनी फिर्याद दिलेली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image
go to top