सोनाराला गंडा घालणाऱ्यांकडे पोलिसांचे दुर्लक्ष

सोनाराला गंडा घालणाऱ्यांकडे पोलिसांचे दुर्लक्ष

लोणी काळभोर - स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवुन, कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील एका नामांकित सोनाराला आठ ते नऊ जणांच्या टोळीने तब्बल दिड कोटी रुपयाना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फसवणुकीचा हा प्रकार ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घडला असुन, फसवणुक झालेल्या सोनाराने फसवणुक झाल्याबाबतची लेखी तक्रार व आरोपींच्याच्या हालचालीबाबतची सखोल माहिती महिनाभरापुर्वीच लोणी काळभोर पोलिसांना दिली आहे. मात्र लोणी काळभोर पोलिसांनी आरोंपीच्या पर्यंत पोहचण्यासाठी कसल्याही हालचाली न केल्याने, या प्रकरणातील आरोपी उजळ माथ्याने हडपसर व लोणी काळभोर परीसरात राजरोसपणे फिरत असल्याचे दिसुन आले आहे. 

संतोष जैन हे त्या फसवणुक झालेल्या सोनाराचे नाव असुन, त्यांचा कदमवाकवस्ती येथील लोणीस्टेशन परीसरात नाकोडा ज्वेलर्स या नावाने सुर्वणपेढी आहे. दरम्यान वरील टोळीने संतोष जैन यांच्या बरोबरच उरुळी कांचन, वाघोली व कात्रज परीसरातील आनखी तीन सोनाराना अशाच प्रकारे कोट्यावधी रुपयांचा गंडा घातल्याची चर्चा सुरु झाली आहे. विशेष बाब म्हणजे फसवणुक करणाऱ्या टोळीतील एका आरोपीस लोणी काळभोर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने चौकशीसाठी पोलिस ठाण्यात आणले होते. मात्र संबधित आरोपीस पोलिसांनी चौकशी न करताच सोडुन दिल्याने लोणी काळभोर पोलिसांच्या विश्वासहर्तेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

संतोष जैन यांनी लोणी काळभोर पोलिसांना दिलेल्या लेखी तक्रारीनुसार, लोणीस्टेशन परीसरात रहाणाऱे एका कुटुंब वारंवार सोणे खरेदीसाठी संतोष जैन यांच्या दुकानात येत  असल्याने, संतोष जैन यांचा मुलगा भैरव व संबधित कुटुंब प्रमुखाशी चांगली ओळख झाली होती. सहा महिण्यापुर्वी संबधित कुटुंब प्रमुखाने भैरव यास वीस तोळे सोने बाजारभावापेक्षा कमी दरात दिले होते. त्यानंतर ऑक्टोबर महिण्याच्या पहिल्या आठवड्यात संबधित व्यक्तीने पुन्हा एकदा भैरव यास स्वस्तात सोऩे हवे का अशे विचारले. स्वस्तात सोने मिळेल या आशेने भैरव याने होकार दिला. यावर भैरव याच्या दोन चारचाकीमधुन आलेल्या कांही व्यक्तीनी एक कोटी पच्चावन्न लाख रुपये नेले. तसेच दुसऱ्या दिवसी सोने आनुन देतो असे आश्वासन भैरव यास दिले. मात्र आठ दिवसानंतरही संबधित व्य.क्तीकडुन सोने मिळणे दुरच, संबधित व्यक्ती फोनही घेत नसल्याचे लक्षात येताच भैरव व त्याचे वडील संतोष जैऩ यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात जाऊन घडलेल्या घटनेची माहिती दिली. यावर पोलिसांनी जैऩ यांच्याकडे लेखी तक्रारीची मागणी केली. यावर जैऩ यांनी लेखी तक्रारही दिली. मात्र त्यानंतर पोलिसांनी केवळ जैऩ यांच्याकडे विचारपुस करण्यापलिकडे आरोपींना अटक करण्यासाठी कसलीही हालचाल केली नाही. 

याबाबत अधिक माहिती देताना संतोष जैऩ म्हणाले, स्वस्तात सोने देण्याच्या नावाखाली भेरव याच्या ओळखीतील कांही लोकांनी एक कोटी पच्चावन्न लाख रुपये नेले आहेत. मात्र संबधित व्यक्तीकडुन सोने न मिळाल्याने, फसवणुक झाल्याची लेखी तक्रार लोणी काळभोर पोलिसांना दिली आहे. तर दुसरीकडे् संबधित टोळीतीलच एका व्यक्ती फसवणुक झालेल्या टोळीतील सदस्यांची माहिती हवी असल्यास पंधऱा लाख रुपये लागतील असे सांगत टोळीच्या अटकेसाठी पोलिसांना मदत करण्याची तयारी दर्शवीत आहे. संबधित व्यक्तीने टोळीतील सर्व सदस्यांचे पत्ते, फोटो, वापरत असलेल्या वाहनांचे नंबरही दिले असुन, ती माहितीही पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी आरोपींच्या पत्ता व सध्याची माहिती घेण्याशिवाय कांहीही हालचाली केलेल्या नाहीत. दरम्यानच्या काळात यवत पोलिसांनी वरील टोळीतील एका प्रमुख सदस्यास फसवणुकीच्या गुन्ह्यात मुबंईहुन ताब्यात घेतले होते. तर बुधवारी (ता. 22) रात्री फारच आग्रह केल्यानंतर, फसवणुक करताना संबधित टोळीने वापरलेल्या वाहनाच्या मालकास चौकशीसाठी पोलिस ठाण्यात आनले होते. मात्र त्यासही केवळ जुजबी माहिती विचारुन सोडुन दिल्याने, पोलिसांच्यावर विश्वास उरलेला नाही. घडलेल्या घटनेची माहिती पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांना कळवली असुन, त्यांनी भेटीसाठी बोलावले आहे. 

घटना गंभीर, चौकशी करणार- पोलिस अधिक्षक संदीप पाटील..
दरम्यान याबाबत बोलताना पोलिस अधिक्षक संदीप पाटील म्हणाले, घडलेली घटना गंभीर आहे. मात्र या प्रकरणची चौकशी करण्यात पोलिसांनी का टाळाटाळ केली याची माहिती घेण्यासाठी फसवणुक झालेल्या संतोष जैऩ यांना अधिक्षक कार्यालयात बोलावले आहे. त्यांच्याकडुन माहिती घेऊन, पुढील कारवाई करण्यात येणार आहे. यात कोणीही दोषी आढळले तरी कारवाई करणार. तसेच फसवणुक करणाऱ्या टोळीची पाळेमुळे खनुन काढण्यासाठी त्वरीत आदेश देणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com