Crime News : एनडीए उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला पोलिसांनी केले तात्काळ अटक

ब्लास्ट करून राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला पोलिसांनी तात्काळ पकडले.
Crime
CrimeSakal

खडकवासला - ब्लास्ट करून राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला पोलिसांनी तात्काळ पकडले.

या प्रकरणी अमोल महादेव वाघ (वय-३३, रा. इंदिरा वसाहत, उत्तमनगर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीसांच्या सहाय्यता नंबरवर अमोलने गुरुवारी संध्याकाळी साडे पाच वाजता फोन आला. पुणे व अहमदनगर येथे सहा व्यक्ती प्रत्येकी तीन ठिकाणी ब्लास्ट करणार आहे.‌ त्यांच्या जवळ मशीन गन आणि आरडीएक्स आहे. असे सांगितले. त्यांने कॉल करताना दोघांचे फोन नंबर ही दिले. ते दोघे एनडीएमध्ये ब्लास्ट करणार असल्याची खबर दिली.

ही माहिती उत्तमनगर पोलिसांना‌ दिली. पोलीसांनी एनडीए गाठले. लेफ्टनंट कर्नल थापा, कर्नल पांडे आणि मेजर ठोंबरे यांनी एनडीएची यंत्रणा अलर्ट केली. दुसऱ्या बाजूला पोलिसांना कॉल आलेल्या नंबरचे लोकेशन शोधले. तसेच कॉल करणाऱ्याला एका तासाच्या आत पकडले.

त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याच्या वडिलांनी जमीन विकली. त्याला काही ही दिले नाही. वडिलांनी आणि सासऱ्यांने मानसिक त्रास दिला आहे. त्या रागातून त्याने तो फोन दारूच्या नशेत केल्याचे स्पष्ट झाले. वडिलांनी आणि सासऱ्यांना त्रास देण्याच्या उद्देशाने कॉल केल्याचे यावेळी निष्पन्न झाले.

कोथरुड मध्ये दोन दिवसांपूर्वी दोन दहशतवादी पकडले होते. त्या पार्श्वभूमी ब्लास्ट करून राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी(एनडीए) उडवून देण्याची माहितीचा फोन आला. ही माहिती मिळाल्यानंतर उत्तमनगर पोलिसांची खूपच धावपळ झाली. आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती.

उत्तमनगर पोलिसांच्या तपास पथकाने सुमारे‌ तासाभरात ताब्यात घेतले. वडील व सासरे यांना त्रास देण्याच्या उद्देशाने हा कॉल केल्याचे उत्पन्न झाल्यावर पोलीस निरीक्षक किरण बालवडकर आणि त्यांच्या टीमने सुटकेचा निःश्वास सोडला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com