गळ्याचा फास अखेर पोलिसांनी सोडला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मे 2019

घरातील वादामुळे दारूच्या नशेत गळफास घेऊन आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तरुणाला दत्तवाडी पोलिसांनी वाचविले. ही घटना पर्वती दर्शन येथे घडली. 

पुणे - घरातील वादामुळे दारूच्या नशेत गळफास घेऊन आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तरुणाला दत्तवाडी पोलिसांनी वाचविले. ही घटना पर्वती दर्शन येथे घडली. 

दत्तवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत बीट मार्शल विष्णू सुतार आणि अनिल लांडे हे गस्त घालत होते, त्या वेळी ‘एक जण घरात गळफास घेऊन आत्महत्या करत आहे, त्याला त्वरित मदत करावी,’ अशी सूचना त्यांना पोलिस नियंत्रण कक्षातून मिळाली. यानंतर या दोघांनी त्वरित पर्वती दर्शन येथे जाऊन या घराचा शोध घेतला. एका घराच्या खिडकीतून पाहिले असता, तरुणाने घरातील लोखंडी रॉडला ओढणीने गळफास घेतल्याचे त्यांना दिसले. त्यानंतर पोलिसांनी वेळ न गमावता घराचा लोखंडी दरवाजा धक्के मारून तोडला व आतमध्ये प्रवेश केला. त्यांनी त्वरित या तरुणाच्या गळ्याचा फास सोडवून त्याला खाली उतरविले आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती आता स्थिर आहे. 

याबाबत वरिष्ठ निरीक्षक देविदास घेवारे म्हणाले, ‘‘या तरुणाचा त्याच्या पत्नीबरोबर वाद झाला होता. यामुळे राग आल्याने त्याने पत्नीच्या मोबाईलवर गळफास घेत असल्याचा मेसेज केला. ती कामावर होती. याबाबत तिने त्वरित पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. त्यानंतर सुतार आणि लांडे यांनी अवघ्या पाच ते सात मिनिटांत घटनास्थळी जाऊन त्या तरुणाचे प्राण वाचविले.’’ 

Web Title: The police left the neck loop

टॅग्स