पुण्यात लाचखोरीत पोलिसच एक नंबर; तर दुसरा नंबर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020

  • पुणे विभागात लाचखोरीत पोलिस पहिल्या क्रमांकावरच
  • महसुल विभाग दुसऱ्या क्रमांकावर पोचला 

पुणे : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मागील वर्षी सर्वाधिक 184 लाच प्रकरणाच्या कारवाया पुणे विभागामध्ये केल्या आहेत. त्यामध्ये 51 प्रकरणात पोलिस व 42 प्रकरणांमध्ये महसुल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सापळा रचून कारवाई केलेली आहे. "एसीबी'अंतर्गत येणाऱ्या पाच जिल्ह्यांपैकी पुणे जिल्ह्यात 65 कारवाया करण्यात आल्या आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पुणे विभागाच्यावतीने 2019 यावर्षामध्ये केलेल्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये "एसीबी'चे पोलिस अधिक्षक राजेश बनसोडे यांनी याबाबत माहिती दिली. 

काँग्रेसच्या 'या' दिग्गज नेत्याची होणार चौकशी; चारशे कोटींचे प्रकरण

बनसोडे म्हणाले, "देशात लाचखोरीसंबंधी सर्वाधिक कारवाई महाराष्ट्राने केली आहे. तर राज्यात लाचखोरीसंबंधी सर्वाधिक 184 कारवाई पुणे विभागाने केली आहे. 2020 मध्ये आत्तापर्यंत 28 लाचखोरीची कारवाई झाली आहे. 2019 मध्ये याच काळात झालेल्या कारवाईशी तुलना केल्यानंतर यावेळी कारवाईमध्ये वाढ झाली आहे. राज्य लाचलुचपत प्रतिबंध विभागाने पुणे विभागास "बेस्ट रेंज रिवार्ड' देवून सन्मानित केले आहे.'' 

मागील वर्षी 184 सापळा कारवाईमध्ये 261 आरोपींना पकडण्यात आले आहे. त्यामध्ये वर्ग एकचे 11, वर्ग दोनचे 18, वर्ग तीनचे 158 , वर्ग चारचे 15 आरोपी लोकसेवक आहेत. इतर लोकसेवक 13 व खाजगी 46 व्यक्तींचा लाचखोरीच्या प्रकरणात समावेश आहे. सापळा कारवाईत झालेल्या सर्व वर्ग एक व दोनच्या आरोपी लोकसेवकांच्या मालमत्तेची उघड चौकशी अनिवार्य करण्यात आली आहे. इतरांच्या बाबतीत गुणवत्तेनुसार निर्णय घेतला जातो. "एसीबी'च्या जनजागृती उपक्रमामुळे बरेच नागरिक टोल फ्री क्रमांक 1064 यावर संपर्क साधून विभागाची माहिती जाणून घेतात. 2019 मध्ये 1099 फोन आले होते. तायावरुन 17 यशस्वी सापळा कारवाई करण्यात आली, असल्याचे त्यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Most Corrupt Of All Govt Departments In Pune