आरोपीच्या जामिनासाठी पोलिस अधिकाऱ्याला शिवीगाळ

संदीप घिसे 
शुक्रवार, 18 मे 2018

पिंपरी (पुणे) : मारहाणीच्या गुन्ह्यांमध्ये अटक असलेल्या मुलाला जामीन मिळावा, यासाठी त्याच्या आईने पोलिस चौकीत अधिकाऱ्याला शिवीगाळ करीत अंगावर धावून गेली. तर अन्य एकाने अधिकाऱ्यास थेट पोलिस आयुक्‍तांकडे तक्रार करण्याची धमकी दिली. ही घटना बुधवारी सायंकाळी थेरगाव पोलिस चौकी येथे घडली. 

शैला रमेश तिवारी आणि नंदू बारणे (रा. पिंपळे सौदागर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. पोलिस उपनिरीक्षक राजकुमार केंगार यांनी गुरुवारी (ता.17) वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शैला यांचा मुलगा मारहाण करून गंभीर दुखापत करण्याच्या गुन्ह्यामध्ये अटक असून सध्या तो तुरुंगात आहे. त्याला जामीन मिळण्यासाठी पोलिसांचा अभिप्राय आवश्‍यक असतो. हा अभिप्राय तुम्ही का देत नाही, त्याचा जामीन झालाच पाहिजे, असे म्हणत शैला यांनी थेरगाव पोलिस चौकीतच पोलिस अधिकाऱ्यास शिवीगाळ करीत त्यांच्या अंगावर धावून गेल्या. त्यानंतर नंदू बारणे याने फिर्यादी पोलिस अधिकारी केंगार यांना फोन करून तुम्ही आरोपीकडून दहा हजार रुपये घेता आणि जामिनासाठी अभिप्राय देत नाहीत, असे म्हणत तुमची पोलिस आयुक्‍तांकडे तक्रार करतो, अशी धमकी दिली. सहायक निरीक्षक महेश स्वामी याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Web Title: police officer listen abusing words for criminal bail

टॅग्स