शहरात रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढणार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 नोव्हेंबर 2018

पुणे :"व्यापाऱ्यांना निर्भयपणे व्यवसाय करता यावा, यासाठी रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवून कायदा व सुव्यवस्था आणखी सक्षम करण्यात येईल,'' अशी ग्वाही पोलिस आयुक्त के. वेंकटेशम यांनी पुणे शहर व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी बोलताना दिली. दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्र आदी सण कोणतीही अनुचित घटना न होता शांततेत पार पडल्याबद्दल पोलिस आयुक्त के. वेंकटेशम यांचा पुणे शहर व्यापारी असोसिएशनतर्फे सुरेश जैन यांनी गणेशमूर्ती देऊन त्यांचा सत्कार केला. 

त्या प्रसंगी पोलिस निरीक्षक रेखा साळुंखे तसेच असोसिएशनचे पदाधिकारी मेहुल ओसवाल, संकेत ओसवाल, दशरथ कवाड, चंदू ओसवाल आदी उपस्थित होते. शहरातील वाहतूक सुधारणा करण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या असून, त्याचे दृश्‍य परिणाम लवकरच दिसतील, असेही त्यांनी सांगितले. 

Web Title: Police paroling increase in night city