पोलीस पाटलांनी निर्व्यसनी राहिले पाहिजे : मधुकर तळपाडे

दत्ता म्हसकर
मंगळवार, 15 मे 2018

जुन्नर (पुणे) : "गावच्या पोलीस पाटलांनी निर्व्यसनी राहिले पाहिजे. तसेच गावातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत." , असे प्रतिपादन माजी पोलीस अधीक्षक मधुकर तळपाडे यांनी केले. 
जुन्नर तालुक्यातील घाटघर येथे नवनियुक्त पोलीस पाटलांचा सत्कार समारंभ रविवारी आयोजित करण्यात आला होता, यावेळी ते बोलत होते. 

'कै.जिजाबा रामजी रावते (पाटील) प्रतिष्ठान', घाटघर ग्रामस्थ व ऋषिकेश परिवार यांच्या वतीने सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. 
तळपाडे म्हणाले, पोलीस पाटील गावात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम करत असतो तर सरपंच विकास योजना राबवत असतो. या दोघांनी एकत्र येऊन काम केले तर गावाचा विकास होण्यास वेळ लागणार नाही. पोलीस पाटलांचे अधिकार, ते कोणते पंचनामे करू शकतात, तसेच त्यांना कोणती रजिस्टर हाताळावी लागतात याविषयी त्यांनी माहिती दिली.

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.उमेश गोडे, डॉ.अर्जुन दिघे, सुरेश जोशी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थ नंदू पानसरे, गणू डामसे आदींनी मनोगत व्यक्त केले. तुकाराम रावते यांनी प्रास्ताविक केले. सुत्र संचलन अशोक लाडे यांनी केले. पोलीस पाटील शैला रावते यांनी आभार मानले.
 
Web Title: police patils should remain not addicted said by madhukar talpade junnar