उरुळी कांचन येथील मटका अड्ड्यावर छापा; ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त

सकाळ वृत्तसेवा
Friday, 16 October 2020

उरुळी कांचन बाजारस्थळाजवळ लोणी काळभोर पोलिसांनी बुधवारी (ता. १४) रात्री मटका अड्ड्यावर छापा टाकुन, बिगर परवाना कल्याण नावाचा मटक्याचे मटक्याचे साहित्य, रिक्षा व रोख रक्कम असा एकुण ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

लोणी काळभोर (पुणे) : ऊरूळी कांचन (ता. हवेली) येथील थ्रिस्टार जुगार व मटका जेसीबीच्या साह्याने भुईसपाट केल्याच्या घटनेस आठ दिवसांचा कालावधी उलटण्याच्या आतच, उरुळी कांचन बाजारस्थळाजवळ लोणी काळभोर पोलिसांनी बुधवारी (ता. १४) रात्री मटका अड्ड्यावर छापा टाकुन, बिगर परवाना कल्याण नावाचा मटक्याचे मटक्याचे साहित्य, रिक्षा व रोख रक्कम असा एकुण ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

Pune Rain : अनेकांसाठी ठरली रात्र वैऱ्याची; पाणी घरांत घुसल्याने नागरिकांना भरली धडकी

याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी मटका अड्ड्याचा मालक जावेद उर्फ राजु नुरमहम्मद शेख ( रा. उरूळी कांचन, ता.हवेली) याच्यासह भिमराव तुकाराम कसबे (वय ५०, रा. भिमशक्ती नगर, चिखली ता. हवेली)  या दोघांच्यावर मुंबई जुगार प्रतिबंधक अधिनियम कायदा कलमान्वये गुन्हा दाखल केला असुन, जावेद शेख हा कारवाईची माहिती मिळताच फरार झाल्याची माहिती लोणी काळभोरचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिली आहे.

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन बाजार मैदानात चोरुन मटका चालु असल्याची माहिती, सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन चौधरी यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पवण चौधरी व त्यांचे पोलीस हवालदार, म. जे. गायकवाड, सचिन पवार, एस. व्ही. पवार यांनी बाजार मैदानातील मटका अड्ड्यावर छापा टाकला असता, भिमराव कसबे हा रिक्षामध्ये कल्याण नावाचा जुगार चालवत असल्याचे दिसुन आले. यावर पोलिसांनी कसबे यांची रिक्षा व मटका खेळण्याचे साहित्य, रोख रक्कम असे ७५ हजार रुपयांचे साहित्य जप्त केले. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन चौधरी करीत आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अवैध धंदे वाल्यांचे शेपुट वाकडे ते वाकडेच...
जिल्हा (ग्रामिण) पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी अधिक्षक या नात्याने पदभार स्विकारतानाच, मटका, जुगार, अवैध दारु विक्रीसह वाळु वहातुक या सारख्या सर्वच प्रकारच्या अवैध धंदे कायमस्वरुपी बंद करण्याबाबतचे सुतोवाच केले होते. व पोलिस अधिकाऱ्यांनाही आपआपल्या पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सर्वच प्रकारचे अवैध धंदे कायमस्वरुपी बंद करण्याच्या सुचना केल्या होत्या. मात्र अधिक्षकांनी सुचना करुनही, अनेक ठिकाणी चोरुन मटका व जुगार यासारखे अवैध धंदे चालु असल्याचे पोलिसी कारवाईवरुन दिसुन येत आहे. मागील आठ दिवसात केवळ लोणी काळभोर पोलिसांनी दोन वेळा मटका व जुगार यासारख्या अवैध धंद्यावर कारवाई करुन, लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. तर सासवड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जुगार अड्ड्यावरील कारवाईही चांगलीच गाजली होती. यामुळे अधिक्षकांनी आदेश देऊनही चोरुन अवैध धंदे सुरु राहणार असतील तर, अवैध धंदे वाल्यांचे शेपुट वाकडे ते वाकडेच राहणार का असा प्रश्न सर्वसामान्य नागरीकांना पडला आहे.

सिगारेट ओढण्यास नकार दिल्याने जीवे मारण्याची धमकी; तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police raid on Matka hideout at Uruli Kanchan