Pune: कार्ल्यात पार्टीवर पोलिसांचा छापा; १७ जणांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime
बेकायदेशीर पार्टीवर कार्ल्यामध्ये छापा

Pune: कार्ल्यात पार्टीवर पोलिसांचा छापा; १७ जणांना अटक

लोणावळा: कार्ला गावच्या हद्दीत एमटीडीसीजवळ दुर्गा सोसायटीमधील एका बंगल्यात बेकायदेशीर पार्टीत स्पीकरवर गाणे लावून, त्यावर अश्र्लील हावभाव करणाऱ्या १७ जणांना पोलिसांनी अटक केली. यामध्ये नऊ पुरुष आणि आठ महिलांचा समावेश आहे. रोख रक्कम, मोबाईल फोन, ५ चारचाकी वाहने, स्पीकर असा एकूण ७४ लाख २७ हजार ६३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्ल्याजवळील एका बंगल्यात पार्टी सुरू असून, पुरुष व महिला अश्लील डान्स करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी दोन पथके तयार करुन, दुर्गा सोसायटीमधील तन्वी बंगल्यावर छापा मारला. त्यावेळी ९ पुरुष आणि ८ महिला गाण्यावर डान्स करीत असल्याचे दिसून आले.

हेही वाचा: पुणे : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटेनर झाला उलटला

ऋषिकेश संजय पठारे, अमित कृष्णा मोरे, योगेश संदेश काशिद, विकास रामचंद्र पारगे, कैलास मारुती पठारे, स्वप्नील जगदीश तापकीर, विनोद रमेश डख, प्रसाद बाळासाहेब वीर, नागेश कुंडलीक थोरवे (सर्व रा. चऱ्होली) यांच्यासह आठ महिलांवर कारवाई केली आहे.

loading image
go to top