पुणे : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटेनर झाला उलटला

महामार्गावर व सेवा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी
Pune
Punesakal

पुणे : बंगळुरू मुंबई महामार्गावरील नवले पुलाजवळ पुन्हा अपघात झाला आहे. साताराकडून मुंबईकडे जाणार कंटेनर पलटी झाला आहे. कोणतीही जिवीतहानी झालेली नाही पण मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. वारजे ब्रिज पासून नवले ब्रिज पर्यंत वाहनांच्या मोठ्या रांगा असून गेल्या एक तासांपासून वाहतूक खोळंबली आहे. महामार्गावर व सेवा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी...दोन किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा..

बंगळुरू मुंबई महामार्गावर  नवले पुल जवळ अपघातांची मालिका सुरूच आहे. कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने महामार्गावरील  विश्वास हॉटेल समोरील दुभाजकाला धडकून कंटेनर पलटी झाला. यामध्ये चालक जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी सकाळी नऊ वाजण्याच्या दरम्यान घडली.

Pune
मुंबई: भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीआधी घडली महत्त्वाची घडामोड

याबाबत मिळालेली माहिती अशी की, साताराकडून मुंबईच्या दिशेने निघालेल्या कंटेनर नवले पुल परिसरात आल्यानंतर कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि महामार्गावरील रस्त्याच्या मधोमध असणाऱ्या दुभाजकाला धडकून कंटेनर पलटी झाला. अपघात एवढा भीषण होता की, चालकाच्या केबिनचा अक्षरशः चुराडा झाला. यामध्ये चालक जखमी झाला असून त्याला जवळच्या मोरया हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

अपघाताचे वृत्त समजताच सिंहगड रस्ता वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह शिंगाडे, सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत कणसे हे पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी तातडीने पोहचले. अग्निशमन दलाच्या जवानांनी जखमी चालकाला बाहेर काढले. पाच क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहन काढण्याचे काम सुरू असून महामार्गावर दोन्ही बाजूंनी दोन किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहे.. सकाळची ऑफिसची वेळ असल्याने चाकरमान्यांना ऑफिसमध्ये जाण्यासाठी उशिरा होत आहे.

Pune
नागपूर : सणासुदीच्या दिवसांत वेतन उशिरा? कामगारांमध्ये नैराश्‍येचे वातावरण

सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही....

सकाळी नऊ दरम्यान कामांवर जाणाऱ्यांची लगबग सुरू असते. यावेळी नवले पुल परिसरातील महामार्गावर रोज गर्दी असते. मात्र आज महामार्गावर अपघात घडला त्यावेळी आजूबाजूला कोणतेही वाहन नसल्याने मोठा अनर्थ टळला. अपघातग्रस्त कंटेनर ची अवस्था पाहिल्यानंतर अपघाताची भीषणता लक्षात येते आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com