esakal | अनअधिकृत कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा; ३३ लाखांचा ऐवज जप्त
sakal

बोलून बातमी शोधा

crime

भिगवण : अनअधिकृत कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा; ३३ लाखांचा ऐवज जप्त

sakal_logo
By
डॉ. प्रशांत चवरे

भिगवण : भिगवण स्टेशन (ता. इंदापुर) येथे अनअधिकृतरित्या सुरु असलेल्या कत्तलखान्यावर रविवारी (ता. १८) पहाटे भिगवण पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईत कत्तलखान्यातील तिघांना ताब्यात घेतले आहे तर ३२ लाख ८५ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला असल्याची माहिती भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने यांनी दिली आहे.

हेही वाचा: पुणे जिल्ह्यातील न्यायालयीन कामकाजाच्या वेळा बदलल्या

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः भिगवण स्टेशन(ता.इंदापुर) येथील डोंगराच्या बाजुला अवैध्य कत्तलखाना सुरु असल्याची माहिती भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने यांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते व उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगांवकर यांचे मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने, सहाय्यक फौजदार काळभोर, पोलिस हवालदार समिर करे, दत्तात्रय जाधव व पोलिस कर्मचाऱ्यांनी भिगवण स्टेशन येथील डोंगराच्या बाजुला असलेल्या पत्र्याच्या शेडवर छापा टाकला असता त्या ठिकाणी जनावरांचा कत्तलखाना असल्याचे आढळुन आले. घटनास्थळी तौसिफ ख्वाजा कुरेशी (वय. २७) आयाज अब्दुल काझी (वय. ३० रा. दोघे भिगवण स्टेशन, ता. इंदापुर) व अमजद कालेसाहब शेख (वय. ३१ रा. गुणवडी, ता. बारामती) आढळून आले त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले तर इतर १४ ते १५ जण अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले.

छाप्यामध्ये पोलिसांनी १५ लहान मोठी वाहने,तसेच गोमांस असा एकुण ३२ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यातील आरोपींविरुध्द महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास भिगवण पोलिस ठाण्याचे साहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने यांचे मार्गदर्शनाखाली भिगवण पोलिस करीत आहेत.

हेही वाचा: शेतकऱ्यांच्या अडचणीत भर; दुधाचे खरेदीदर गडगडले