रखडलेली पोलिस भरती लवकरच - अनिल देशमुख

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 जानेवारी 2020

‘राज्यात कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी आगामी काळात प्रयत्न केले जातील. पोलिस भरती का रखडली, याबाबत माहिती घेऊन ही प्रक्रिया पुन्हा सुरू केली जाईल,’’ अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

बारामती - ‘राज्यात कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी आगामी काळात प्रयत्न केले जातील. पोलिस भरती का रखडली, याबाबत माहिती घेऊन ही प्रक्रिया पुन्हा सुरू केली जाईल,’’ अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी देशमुख बारामतीत आले होते, त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. देशमुख म्हणाले, ‘‘पवार यांनी माझ्यावर राज्याच्या गृहमंत्रिपदाची आव्हानात्मक जबाबदारी सोपविली आहे. ती मी योग्यरीतीने पार पाडील. नागपूरचा उल्लेख क्राईम कॅपिटल म्हणून होत आहे.

रोजगार निर्मितीसाठी पंतप्रधान मोदींनी उचलले पाऊल!

वास्तविक, तो माजी मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ आहे. गृह विभागासह अनेक जबाबदाऱ्या त्यांच्याकडे होत्या. त्यामुळे त्यांना या विभागाकडे लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नसेल. मात्र, आता नागपूरसह राज्यातील सर्व शहरांमध्ये कायदा व सुव्यवस्थेसाठी लक्ष दिले जाईल.’’  गृहमंत्रालय माझ्यासाठी नवीन आहे. राज्यातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांशी बुधवारी (ता. ८) चर्चा करण्यात येईल. त्यानंतर कोणत्या विषयांना प्राधान्य द्यायचे, हे ठरवून पुढील दिशा निश्‍चित केली जाणार असल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले.

विमानतळ पोलिस ठाणे बांधा
वडगाव शेरी - पुणे-नगर रोडवर इनऑर्बिट मॉल शेजारी विमानतळ पोलिस ठाण्याच्या इमारतीचे भूमिपूजन होऊन तीन वर्षे झाली, तरीही काम अपूर्णच आहे. त्यामुळे हे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला द्याव्यात, अशी मागणी आमदार सुनील टिंगरे यांनी आज गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली. यावर गृहमंत्र्यांनी कार्यवाहीची सूचना केली. शपथविधीनंतर गृहमंत्री प्रथमच पुण्यात आले होते. त्यांचे सुनील टिंगरे, चेतन तुपे आदींनी स्वागत केले. नगर रोडवर २६ गुंठे जागेत साडेतीन कोटी रुपये खर्चून अद्ययावत पोलिस ठाण्याचे भूमिपूजन तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट यांनी १५ ऑक्‍टोबर २०१६ रोजी केले होते.

गृहमंत्र्यांकडून आढावा
राज्य सरकारचे मंत्रिमंडळ निश्‍चित झाल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी धावत्या दौऱ्यामध्ये पुणे व पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तांची भेट घेतली. १५ मिनिटांच्या या भेटीमध्ये दोन्ही शहरांतील कायदा व सुव्यवस्थेच्या सद्यःस्थितीसह एल्गार प्रकरणाचीही माहिती त्यांनी घेतली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police Recruitment soon anil deshmukh