बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक आणि खंडणी प्रकरणतील ताजे अपडेट काय आहेत पाहा

jail.jpg
jail.jpg
Updated on: 

पुणे : बांधकाम व्यावसायिकाची जमिनीच्या व्यवहारात 72 लाख रुपयांची फसवणूक आणि खंडणी प्रकरणी बडतर्फ पोलिस शैलेश जगताप, त्याचा पुतण्या जयेश जितेंद्र जगताप, बडतर्फ पोलिस परवेज शब्बीर जमादार, पत्रकार देवेंद्र जैन आणि अमित विनायक करपे यांच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने 20 जुलैपर्यंत वाढ केली आहे. 

माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे (रा. सिंहगड रोड) आणि प्रकाश फाले (रा. सांगवी) या दोघांवर या प्रकरणात गुन्हा दाखल आहे. याबाबत बांधकाम व्यवसायिक ऋषीकेश बारटक्के (वय 35, रा. बाणेर) यांनी समर्थ पोलिसात फिर्याद दिली आहे. जून 2017 ते नोव्हेंबर 2018 या कालावधीत ही घटना घडली. फिर्यादींना सेनापती बापट रस्त्यावरील एका जमिनीच्या दाव्याचा निकाल आपल्याच बाजूने लागणार असल्याचा विश्‍वास आरोपींनी दाखवला. त्यानंतर फिर्यादींनी जमिनीचा व्यवहार केला होता. परंतु, संशयित आरोपी यांनी बारटक्के यांची विविध मार्गाने तब्बल 72 लाख रुपये घेवून फसवणूक केली.

तसेच जागेचा हक्क सोडण्यासाठी दोन कोटी आणि जागेच्या मालकाला अडीच कोटी रुपये देण्याची मागणी फिर्यादींकडे करण्यात आली. व्यवहाराबाबत विचारणा केल्यानंतरही फिर्यादींच्या डोक्‍याला पिस्तुल लावून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस कोठडीची मुदत संपल्याने पाच जणांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले. त्यावेळी गुन्ह्यातील रक्कम जप्त करण्यासाठी आणि इतर तपासासाठी सर्वांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली. बचाव पक्षातर्फे ऍड. विजयसिंह ठोंबरे आणि ऍड. प्रसाद कुलकर्णी यांनी जामिनाला विरोध केला. 

आरोपींना मोक्का लागण्याची शक्यता : 
या प्रकरणातील काही आरोपींवर गेल्या काही दिवसांमध्ये खंडणी आणि एकत्रित कट केल्याबद्दल दोन गुन्हे दाखल आहेत. बऱ्हाटे याच्यावर आत्तापर्यंत एकूण पाच गुन्हे दाखल आहेत. आरोपींनी अशाच प्रकारे आणखी काही जणांची फसवणूक केल्याची शक्यता आहे. ते गुन्हे लवकरच उघड होऊ शकता. त्यामुळे आरोपींवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई होण्याची दाट शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Alandi Indrayani River Pollution Sparks Concern Before Kartiki Wari With Sewage And Dead Fish In The River
MPSC Students Protest in Pune Leaders Extend Support as Students Differ Over Objective and Descriptive Exam Pattern
Sharad Pawar
Pune Student Protest: Abhijit Dipke Raises Questions Over Students’ Future
Marathi News Esakal
www.esakal.com