पोलिसाने काढला चौकीतून पळ

Crime
Crime

चाकण - गुन्ह्यासंदर्भातील कागदपत्रे देण्यासाठी लाच मागणाऱ्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकासह त्याच्या दोन हस्तकांवर चाकणमध्ये कारवाई करण्यात आली. याप्रकरणी, संबंधितांना पकडण्यासाठी जीपचा पाठलाग करताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी जखमी झाले आहेत. संबंधित आरोपी चालती जीप जागेवर सोडून पळून गेले तर, लाचेची मागणी करणाऱ्या पोलिस निरीक्षकानेही सापळा लावल्याचे लक्षात आल्यानंतर चौकीतून पळ काढला. दरम्यान, यामध्ये एक पोलिस अधिकारी जखमी झाला. याप्रकरणी, गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

चाकण पोलिस ठाण्यांतर्गत महाळुंगे पोलिस चौकीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल उर्फ भानुदास जाधव यांनी गुन्ह्यासंदर्भातील कागदपत्रे देण्यासाठी सात लाखांची लाच मागितली होती. त्यापैकी तीन लाखांची लाचेची रक्कम त्यांच्या हस्तकाकडे संबंधित व्यक्तीने दिली. त्याचवेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून खराबवाडी (ता. खेड) येथे चाकण-तळेगाव राज्यमार्गावर स्कॉर्पिओचा पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु ते जीप सोडून पळून गेले. जीपचा चालक असलेल्या हस्तकाने चालती जीप रस्त्यावर सोडून दिली. या धावपळीत पोलिस उपअधीक्षक श्रीहरी पाटील यांच्या पायाला जखम झाली. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी संबंधित पोलिस निरीक्षक, एक पोलिस कर्मचारी तसेच पोलिसांचा एक हस्तक अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्याचे काम पोलिस ठाण्यात उशिरा सुरू होते. या प्रकरणातील स्कॉर्पिओ जीप आणि तीन लाख रुपये जप्त करण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, पोलिस निरीक्षक गिरीश सोनवणे यांनी केली. 

पोलिस निरीक्षक जाधव हे गुन्हे शाखा युनिट तीनचे प्रमुख आहेत. पोलिस निरीक्षक जाधव हे पळून गेले होते. त्यांना पोलिस पथकाने महाळुंगे पोलिस चौकीतून ताब्यात घेऊन चाकण पोलिस ठाण्यात आणले. भानुदास जाधव यांच्याविरोधात यापूर्वीही लाच घेतल्याचा गुन्हा दाखल होता. याप्रकरणी त्यांना सहा महिन्यांची शिक्षा झाली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com