पोलिसांनी दबावाला बळी पडू नये - शुक्‍ला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जानेवारी 2017

पिंपरी - तडीपार, मोका तसेच झोपडपट्टी दादा प्रतिबंधात्मक (एमपीडीए) अंतर्गत सराईत गुन्हेगारांवर कारवाई सुरू आहे. निवडणुकीत दबावाला बळी पडू नका, निष्पक्षपणे पोलिसांनी कर्तव्य बजावावे, असे आवाहन पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांनी केले.

वाकड आणि सांगवी पोलिस ठाण्याला मंगळवारी त्यांनी भेट दिली. निवडणूक शांततेमध्ये पार पाडण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचनाही केल्या. या वेळी सह आयुक्त सुनील रामानंद, अतिरिक्त आयुक्त शशिकांत शिंदे, विशेष शाखा उपायुक्त श्रीकांत पाठक, पोलिस उपायुक्त गणेश शिंदे, सहायक आयुक्त वैशाली जाधव माने, वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीधर जाधव तसेच निरीक्षक अजय चांदखेडे आणि कर्मचारी उपस्थित होते.

शुक्‍ला म्हणाल्या, ""निवडणूक आयोगाचे नियम पोलिसांनी समजून घेतले पाहिजेत. त्यामुळे कारवाईत कोणतीही अडचण येणार नाही. सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी हेल्मेटचा वापर करा.''

Web Title: The police should not fall prey to peer pressure