ब्रँडेड कपडे, पैसे स्विकारल्यामुळे पोलिसांचे निलंबन

pune
pune

पुणे : पोलिस दलातील नोकरीचा दुरुपयोग करुन जमीनीच्या व्यवहारामध्ये सहभागी झाल्याच्या कारणावरुन "गनमैन" म्हणून स्वत:ची ओळख निर्माण करणाऱ्या पोलिस हवालदार शैलेश जगताप यांच्यासह आणखी एका पोलिस कर्मचार्याचे निलंबन करण्यात आले आहे. याबाबतचा आदेश अपर पोलिस आयुक्त (प्रशासन) साहेबराव पाटील यांनी दिला आहे. 

लष्कर पोलिस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या पोलिस कर्मचारी शैलेश हरीभाऊ जगताप आणि गुन्हे शाखेत नेमणूकीस असलेल्या परवेज शब्बीर जमादार या दोघांचे निलंबन करण्यात आले असल्याचे आदेशात नमुद केले आहे.

जगताप यांनी आपल्या कामाच्या कार्यक्षेत्राबाहेर जाउन स्वत:च्या वैयक्तिक व आर्थिक फायद्यासाठी नीलमणी धैर्यशील देसाई यांच्या जमिनीच्या व्यवहारामध्ये सहभाग घेतला. त्याचबतोबर जगताप यांनी रोख रक्कम, दुचाकी गाडी,ब्रँडेड कपडे स्विकारल्याचे पोलिस प्रशासनाने केलेल्या अंतर्गत चौकशीत निष्पन्न झाले आहे.

पोलिस कर्मचारी असुनही खोटी व वरिष्ठची जाणीवपूर्वक दिशाभूल केल्याचे आदेशात नमुद केले आहे. जगताप यांच्या बेशिस्त व बेजबाबदार वर्तनामुळे पुणे पोलिसांची प्रतिमा मलिन झाली आहे, त्यामुळे त्यांचे निलंबन करण्यात आले असल्याचे आदेशात स्पष्ठपणे नमुद करण्यात आले आहे.

शैलेश जगताप हे सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जगताप यांचे भाऊ आहेत. जितेंद्र जगताप यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक व माजी उपमहापौर दीपक मानकर यांच्याविरुद्ध समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात मानकर सध्या कारागृहात आहेत. 

"माझा भाऊ जितेंद्र जगताप यांच्या आत्महत्या प्रकरणी राजकीय दबावापोटी मला त्रास दिला जात होता. त्याबाबत माझ्या पुतणीने पोलिस आयुक्ताकडे अर्जही केला आहे. त्यानंतरही निलंबन करण्यात आले आहे. राजकीय सुडबुद्धिने का प्रकार करण्यात आला आहे."
- शैलेश जगताप.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com