विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी कार थांबवली अन् सापडले...

चंद्रकांत घोडेकर 
मंगळवार, 14 जुलै 2020

रस्त्याने एक मारुती सुझुकी कंपनीची सेलेरो मॉडेल असणारी कार (क्रमांक एम एच 14 एच यु 08 43)  ही येताना दिसली. कारमधील लोकांनी तोंडाला मास्क लावले आहे की, नाही याची खात्री करण्यासाठी ग्राम समिती आणि पोलिसांनी कार थांबवली.

घोडेगाव(पुणे) : पारगाव शिंगवे (ता आंबेगाव ) येथे चारचाकी वाहनांतून बेकायदा दारू साठा वाहतूक करणार्‍यांच्या विरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे. मारुती कार आणि दारूसाठा असा एकूण चार लाख सात हजार 488 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी रविवारी (ता 12 ) ताब्यात घेतला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याबाबत मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पारगाव येथे पोलीस नाईक सागर गायकवाड, ग्रामसेवक के डी भोजणे, ग्रामपंचायत कर्मचारी सुधीर रामदास साबळे, रवींद्र ढोबळे आदीं विनाकारण फिरणारे तोंडाला मास्क न लावणार्‍यांवर कारवाई करत होते.

रस्त्याने एक मारुती सुझुकी कंपनीची सेलेरो मॉडेल असणारी कार (क्रमांक एम एच 14 एच यु 08 43)  ही येताना दिसली. कारमधील लोकांनी तोंडाला मास्क लावले आहे की, नाही याची खात्री करण्यासाठी ग्राम समिती आणि पोलिसांनी कार थांबवली. कारची तपासणी करताना त्यामध्ये तीन सीलबंद दारूचे बॉक्स मिळाले. बॉक्स उघडून पाहता त्यामध्ये ७ हजार ४८८ रुपयांचा दारूच्या बाटल्या आढळून आल्या.

Breaking : महाविद्यालय स्तरावर होणार परीक्षा?; 'यूजीसी'चे उपाध्यक्ष काय म्हणाले पाहा!

सदर माल आणि मारुती कार प्रकरणी पोलीस नाईक सागर गायकवाड यांनी कारचालक विजय सिताराम असवले (रा. लाखनगाव ता. आंबेगाव) यांच्याविरोधात मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पुढील तपास पोलिस नाईक सागर गायकवाड करत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police take action against illegal transport of liquor in four wheelers at Pargaon Shingave