esakal | अवैधरित्या दारू वाहतुक करणाऱ्या तीन जणांवर पोलीसांची कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

अवैधरित्या दारू वाहतुक करणाऱ्या तीन जणांवर पोलीसांची कारवाई

sakal_logo
By
टीम ई सकाळ

घोडेगाव : घोडेगाव (ता. आंबेगाव) येथे अवैधरित्या दारू वाहतुक करणाऱ्या तीन जणांवर घोडेगाव पोलीसांनी कारवाई करत त्यांच्याकडून ५ लाख ७ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये वाईन्स शॉप मधून दारू विकणारा दुकानदार असे चार जणांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी दिली.

हेही वाचा: सरकारी कर्मचाऱ्यांना कोरोनाचे दोन डोस बंधनकारक

अशिष बबन पादरे (वय-३१ वर्ष), उत्तम धोंडूशेट पादरे (सर्व रा. सदा बाजार पेठ जुन्नर, ता. जुन्नर), विठ्ठल धर्मा पारधी (वय-३३ वर्ष ), (रा.गोळेगाव जुन्नर, ता. जुन्नर) या तीन व्यक्ति स्विफ्ट गाडीमध्ये ९२ हजार १६० रूपये किंमतीचे मॅकडॉल नं. १ कंपनीच्या ५७६ सिलबंद बाटली ७ हजार २०० रूपये किंमतीच्या इंपिरियल ब्ल्यू कंपनीच्या ४८ सिलबंद बाटली व ७ हजार ६४० रूपये किंमतीच्या ४८ सिलबंद बाटली व ४ लाख रूपये किंमतीची स्विफ्ट डिझायनर गाडी असे एकंदरीत ५ लाख ७ हजार रूपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

उत्तम धोंडूशेठ पादरे यांचे सांगण्यावरून जे. के. वाईन्स घोडेगाव येथून खरेदी करून वाहतुक करत असताना घोडेगाव जवळील जुन्नर फाटा येथे ता १२ रोजी रात्री ८.१५ वाजता चे दरम्यान घोडेगाव पोलीसांना मिळाल्याने पोलीसांनी दारू वाहतुक करणाऱ्या तीन व्यक्तीसह दारू विकणाऱ्या जे. के. वाईन्स घोडेगाव येथील दुकानमालकावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबतची तक्रार घोडेगाव पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई अतिश काळे यांनी दिली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने यांचे मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार नवनाथ वायाळ, पोलीस हवालदार दत्तात्रय जढर, अविनाश कालेकर, संदिप लांडे करत आहे.

घोडेगाव पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात अवैध्य दारू बाबत आणखी तीव्र कारवाई करण्यात येणार असून जे शासनमान्य दारू विक्री करणारे दुकानदार आहेत. त्यांनी चुकीच्या मार्गाने दारूविक्री करून नये. अन्यथा त्यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात येईल, असा इशारा सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी दिला आहे.

loading image
go to top