बारामतीत वाहनचोरीचे गुन्हे रोखण्यासाठी पोलिस कारवाई करणार!

Police to take action to curb vehicle theft in Baramati
Police to take action to curb vehicle theft in Baramati

बारामती : शहरातील वाहनचोरीचे गुन्हे रोखण्यासाठी शहर पोलिसांनी आता धडक मोहिम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिस निरिक्षक नामदेव शिंदे यांनी आज या बाबत माहिती दिली. 

बारामती शहरात गेल्या दशकभरात दुचाकीचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. दरवर्षी दुचाकी विक्रीच्या प्रमाणात मोठ्या संख्येने वाढ होते. दुचाकी अनेकदा लोक बेफिकीरपणे पार्क करुन निघून जातात. विशेषतः गर्दीच्या ठिकाणी दुचाकी कशाही लावून लोक निघून जातात. याचाच चोरटे फायदा घेत दुचाकी चोरुन नेतात. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आता पोलिसांनी नंबरप्लेट नसलेल्या, फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या तसेच वेगाने दुचाकी हाकणाऱ्या वाहनांवर कारवाईची मोहिम हाती घेतली आहे. या पुढील काळात बारामतीत फिरताना दुचाकी चालकांनी गाडी आपलीच असल्याची खात्री पटतील अशी कागदपत्रे किंवा त्यांच्या मोबाईलमध्ये प्रती ठेवणे गरजेचे असेल. दररोज रात्री पोलिसांकडून अचानकच नाकाबंदी केली जाणार असून दिवसाही साध्या वेशातील पोलिस गस्त घालणार असून संशयास्पद वाहनांची कसून तपासणी होणार आहे. 

दरम्यान नागरिकांनीही त्यांना संशयास्पद व्यक्ती किंवा वाहने आढळल्यास तातडीने पोलिसांना कळवावे, असे आवाहन नामदेव शिंदे यांनी केले आहे. नंबरप्लेट नसलेल्या वाहनांवरुन सोनसाखळी चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत, त्या मुळे नंबरप्लेटविना वाहन चालविल्यास पोलिस कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. या शिवाय मुलांच्या हातात दुचाकी देताना आपला मुलगा वाहन कसे चालवतो, या वर पालकांनी लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. 

चोरट्यांनी ATM मशीन स्कॉर्पिओतून पळवलं; 5 मिनिटाची चोरी CCTV त कैद

फॅन्सी नंबरप्लेटवर कारवाई....
दादा, मामा, काका यासह विविध नावांसह इतर प्रकारातील नंबरप्लेट दुचाकी किंवा चारचाकीला आढळल्यास पोलिस कारवाई होणार आहे, त्यामुळे वाहनचालकांनी अशा नंबरप्लेट अगोदरच बदलून घ्याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. 

.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com