
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात संचारबंदी असतानाही विनाकारण रस्त्यांवर फिरण्याचे थांबत नसल्याने पोलिसांची कारवाई अधिक कडक होत असल्याची चिन्हे आहेत. पोलिसांनी एका दिवसात शहराच्या वेगवेगळ्या भागात तब्बल 650 नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. 1100 वाहने जप्त केली असून 1200 जणांना नोटिसा दिल्या आहेत.
कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असताना पोलिस प्रशासनाकडून नाकेबंदी नाक्यांवर अधिक कडक तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतरही नागरीक आत्यावशक काम नसतानाही शहरात सर्रासपणे फिरत असल्याचे चित्र आहे. त्यांच्यावर अटकाव करण्यासाठी पोलिसांकडून पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत कारवाई केली जात आहे.
पोलिसांनी विनाकारण व विनापरवानगी दुचाकी रस्त्यावर आणणार्या 1 हजार 123 दुचाकी जप्त केल्या आहेत. 642 जणांवर संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली आहे. तर 1 हजार 199 नागरिकांना पोलिसांनी नोटीसा बजावल्या आहेत.
मागील आठवडाभर मॉर्निंग वॉकला जाणार्यांवर कारवाई सुरू असताना देखील नागरिक पोलिसांच्या कारवाईस न जुमानता घराबाहेर पडतच आहेत. अशा तब्बल 322 जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. तर मास्क न परिधान करणाऱ्या 305 जणांवर कारवाई केली आहे. कोरोनाला सर्वांच्या प्रयत्नातूनच दूर रोखण्यास मदत होणार आहे.
त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देणे गरजेचे असल्याचे विविध पातळीवर सांगण्यात येत आहे. नागरिकांनी संचारबंदी आदेशाचे पालन करून घराबाहेर पडू नये, असे आवाहन गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त बच्चन सिंग यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.