सामान्यांकडून दंड वसूल; पोलिसांच्या वाहनांकडे मात्र दुर्लक्ष

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 जानेवारी 2020

काळ्या काचेची कोणाचीही मोटार असो, त्यावर कारवाई केली जाते. माझ्या कर्मचाऱ्याच्या मोटारीवर मी स्वत: कारवाई केली आहे. आम्हाला सर्व सारखेच आहेत. सर्वांवर सरसकट कारवाई होणारच. वाहतूक विभागही त्याला अपवाद राहणार नाही.
- नीलिमा जाधव, सहायक पोलिस आयुक्त, वाहतूक विभाग

पिंपरी - वाहनांच्या काळ्या काचा केल्यास वाहतूक पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारला जातो. तर काळ्या काचा असलेल्या पोलिसांच्या सरकारी व खासगी मोटारी राजरोसपणे शहरभर धावत असताना त्याकडे मात्र वाहतूक पोलिसांकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येते. या मोटारींवर कारवाई करणार कोण? असा प्रश्‍न उपस्थित केला जात असून, यातून ‘कुंपणच शेत खातंय’ असा प्रकार सध्या शहरात पहायला मिळत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मोटारीच्या काचा काळ्या करण्यास परवानगी नसतानाही मोटारीच्या चारही बाजूच्या काचा काळ्या करण्याचे प्रमाण अधिक आहे. अधिकाधिक गडद काच काळी करण्याची फॅशनच झाली आहे. रस्त्यावर अनेकदा काळ्या रंगाच्या काचा असलेली वाहने पहायला मिळतात. अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली जाते.

Video : बारावी परीक्षेसाठी ‘सकाळ’चे मार्गदर्शन

या अंतर्गत दंडही वसूल केला जातो. वाहतूक पोलिसांकडून अनेकदा जागेवरच काळी फिल्म काढली जाते. या अधिनियमांतर्गत वाहतूक विभागाने दंडही वसूल केला आहे. मात्र, ही कारवाई केवळ सामान्य नागरिकांसाठीच आहे, का असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. 

पेशवे तलावाच्या भिंतीला धोका

रस्त्यांवर ठिकठिकाणी काळ्या काचा असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्याही मोटारी दिसून येत आहेत. यामध्ये सरकारी वाहनांसह खासगी वाहनांचाही समावेश आहे. मात्र, या वाहनांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police vehicles charged by the general were neglected however