पुणे : पोलिस पत्नींनी पाण्यासाठीचे आंदोलन घेतले मागे
पुणे : शिवाजीनगर पोलिस वसाहतीमध्ये तीन दिवसांपासून पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत संतप्त महिलांनी पालकमंत्री गिरिश बापट यांच्या निवासस्थानावर आज सकाळी हंडा मोर्चा काढला. संतप्त महिलांनी सूरू केलेले रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले आहे.

शिवाजीनगर पोलिस वसाहतीमध्ये गेल्या तीन वर्षांपासून पाण्याचा प्रश्न प्रलंबित आहे. मागील 2 महिन्यात 3 वेळा मोर्चा काढला. परंतू तरी याकडे दुर्लक्ष केले गेले आहे. गेल्या तीन दिवसांपासून शिवाजीनगर पोलिस वसाहतीत पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. पाण्याचे टॅंकर पण येत नसल्य़ामुळे रहिवाशांची गैरसोय होत आहे. आज अखेर संतप्त महिलानी पालकमंत्री गिरिश बापट यांच्या निवासस्थानावर हंडा मोर्चा काढला. गिरीश बापट यांच्यासमोर पाण्याच्या विषयावर संतप्त होत जाब विचारला. यावेळी बापट यांनी महिलांशी संवाद साधून निघुन गेले. महिलांचे गाऱ्हाणे ऐकुन न घेतल्याने नाराज महिलांनी पाण्यासाठी शिवाजीनगर परीसरात रस्ता रोको आंदोलन सुरु केले आहे.
संतप्त महिलांचा फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता अडविण्याचा प्रयत्न केला. मॉर्डन महाविद्यालयाजवळ चालू असलेले रास्ता रोको नंतर ज्ञानेश्वर पादुका चौकात
वऴविले होते. ''पाणी मिळाल्याशिवाय माघार नाही'' या भूमिकेवर संतप्त महिला ठाम होत्या. ३-४ तासांत पोलीस वसाहतीमध्ये आठ टँकर पाठवणार असल्याचे आश्वासन महापौर मुक्ता टिळक यांनी दिले आहे. त्यांनतर पोलिसांनी सामोपचाराने महिलांना हटवले. ज्ञानेश्वर पादुका चौकातून वाहतूक पुन्हा सुरुळीतच आहे.