लोणी काळभोरमध्ये दारुच्या नशेत महिलेकडून पोलिसांनाच मारहाण

जनार्दन दांडगे
मंगळवार, 2 एप्रिल 2019

लोणी काळभोर - दारुच्या नशेत रस्त्यात दुचाकीस्वारांना अडवून मारहाण व शिवीगाळ करणाऱ्या महिलेला पकडण्यासाठी गेलेल्या लोणी काळभोर पोलिस ठाण्यातील महिला पोलिस कर्मचाऱ्याला, एका महिलेकडून मारहाण करण्यात आल्याची घटना रविवारी (ता. 31) रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली आहे. लोणी काळभोर गावातील एका स्थानिक पुढाऱ्याने दारुच्या नशेत सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींची नावे घेऊन पोलिस ठाण्यात गोंधळ घातल्याचे प्रकरण ताजे असतानाच, महिला पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याने लोणी काळभोर पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

लोणी काळभोर - दारुच्या नशेत रस्त्यात दुचाकीस्वारांना अडवून मारहाण व शिवीगाळ करणाऱ्या महिलेला पकडण्यासाठी गेलेल्या लोणी काळभोर पोलिस ठाण्यातील महिला पोलिस कर्मचाऱ्याला, एका महिलेकडून मारहाण करण्यात आल्याची घटना रविवारी (ता. 31) रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली आहे. लोणी काळभोर गावातील एका स्थानिक पुढाऱ्याने दारुच्या नशेत सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींची नावे घेऊन पोलिस ठाण्यात गोंधळ घातल्याचे प्रकरण ताजे असतानाच, महिला पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याने लोणी काळभोर पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

दरम्यान, प्रियंका रावसाहेब धावडे या महिला पोलिस कर्मचाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार, लोणी काळभोर पोलिसांनी नेहा योगेश पारखे (रा. पाषानकर बाग, लोणी काळभोर, मुळगाव - भिमनगर, दौंड) या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. 

दरम्यान, गुन्हा दाखल होण्यापुर्वीच नेहा पारखे फरार झाली असुन, नेहा पारखे हिने आठ महिन्यापूर्वी दारुच्या नशेत लोणी काळभोर पोलिस ठाण्यात शिरुन वरील प्रमाणेच गोंधळ घातल्याची चर्चा पोलिसात सुरु आहे. 

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रविवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास पुणे-सोलापुर महामार्गावरुन लोणी गावात जाणाऱ्या रस्त्यावर स्मशानभूमिजवळ एक महिला दुचाकीस्वारांना अडवुन शिवीगाळ व मारहाण करीत असल्याची माहिती पोलिसंना अज्ञात व्यक्तिने माहिती दिली. यावर प्रियंका धावडे व त्यांच्या पोलिस सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता, नेहा पारखे ही महिला दारुच्या नशेत रस्त्यावरुन येजा करणाऱ्यांना शिवीगाळ करत असल्याचे दिसले. यावर प्रियंका धावडे यांनी नेहा पारखेला दुचाकीस्वारांना मारहाण करण्यापासुन अटकाव करण्याचा प्रयत्न करताच, नेहा पारखे हिने धावडे याना मारहाण करण्यास सुरुवात केली. नेहा पारखे पोलिस कर्मचाऱ्यास मारहाण करत असल्याचे लक्षात येताच, धावडे यांचे सहकारी नेहा पारखे हिला पकडण्यासाठी धावले, मात्र पारखे अंधाराचा फायदा घेत फरार झाली. 

स्थानिक पुढाऱ्याचा पोलिस ठाण्यात गोंधळ...
दरम्यान, लोणी काळभोर गावातील एका पुढाऱ्याने आठच दिवसापुर्वी पोलिस ठाण्यात शिरुन दारुच्या नशेत गोंधळ घातला होता. पोलिस अधिकाऱ्यांना अटकाव करताच, संबधित पुढाऱ्याने सत्ताधारी पक्षांच्या दोन लोकप्रतिनीधीना फोन करुन, अधिकाऱ्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता. तसेच संबधित पुढारी चोविसपैकी अठरा तास पोलिस ठाण्याच्या आसपास वावरत असल्याने, गोंधळाबाबत पोलिसांनी कडक भूमिका घेतली नव्हती. तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षाच्या जिल्हातील दोन लोकप्रतिनीधींनी पोलिस अधिकाऱ्यांना गोंधळ घालणाऱ्या पुढाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल न करण्याची विनंती केल्याने पोलिसांनी संबधित प्रकरण अधिक ताणले नव्हते. मात्र आठच दिवसात खुद्द महिला पोलिसाला मारहाण झाल्याने, अशा प्रवृत्ती विरोधात पोलिस काय कारवाई करतात याकडे नागरीकांचे लक्ष लागुन राहिले आहे.

कायदेशिर कारवाई करणार- पोलिस निरीक्षक सुरज बंडगर...
याबद्दल प्रतिक्रिया देतांना लोणी काळभोरचे पोलिस निरीक्षक सुरज बंडगर म्हणाले, महिला पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या नेहा पारखे या महिले विरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. संबधित महिलेला अटक करण्याच्या सुचना पोलिसांना दिल्या आहेत. पोलिस ठाण्यात शिरुन दारुच्या नशेत गोंधळ घालणाऱ्या पुढाऱ्याला योग्य ती समज देण्यात आली असुन, याबाबतची माहिती वरीष्ठांना देण्यात आली आहे. कायदा व सुवस्था राखणे पोलिसांचे काम असुन, यात गडबड करण्याचा अथवा लुडबुड करण्याचा प्रयत्न करणाऱ्याच्या विरोधात कायदेशिकृर कारवाई करण्यास मागेपुढे पहाणार नाही.

Web Title: a police woman beaten by the drunken woman in loni kalbhor

टॅग्स