Municipal Commissioner naval kishor ram
sakal
पुणे - पुणे महापालिकेतील विविध विकासकामांच्या निविदा ३० ते ५० टक्क्यांपर्यंत कमी दराने भरल्या जात असल्याने कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी हा मुद्दा उपस्थित केला. त्यावर आयुक्त नवल किशोर राम यांनी पुढील दहा दिवसांत कमी दराच्या निविदांबाबत धोरण जाहीर केले जाईल, असे स्पष्ट केले.