Pune News : विद्यापीठातील रामलीलेमुळे समाजमाध्यमांवर महाभारत ; विद्यार्थी हिताचाच बळी जाण्याची शक्यता, राजकीय विचारधारा सक्रीय

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललीत कला केंद्राच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या 'जब वी मेट' या रामलीलेशी निगडीत नाटकामुळे मोठे 'महाभारत' घडत आहे. या आक्षेपार्ह नाटकासंबंधीच्या वादात आता राज्यातील उजव्या आणि डाव्या विचारसणींनी उडी घेतली असून, समाजमाध्यमांवर मोहिमा उघडल्याचे दिसते.
pune
punesakal

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललीत कला केंद्राच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या 'जब वी मेट' या रामलीलेशी निगडीत नाटकामुळे मोठे 'महाभारत' घडत आहे. या आक्षेपार्ह नाटकासंबंधीच्या वादात आता राज्यातील उजव्या आणि डाव्या विचारसणींनी उडी घेतली असून, समाजमाध्यमांवर मोहिमा उघडल्याचे दिसते. घडलेला प्रकार आणि त्यावर होणाऱ्या राजकारणामुळे सरतेशेवटी विद्यार्थी व शिक्षणाचाच बळी जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ललीत कला केंद्रातील नाट्यशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांनी संहिता ते प्रयोग या प्रक्रियेतील "जब वी मेट" हे नाटक शुक्रवारी (ता.२) रात्री सादर केले. अंगणमंचावर सादर झालेल्या या नाटकात रामलीलेत काम करणाऱ्या कलाकांरांचे जीवन दाखविले जात असल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. तर नाटकातील शिव्या आणि आक्षेपार्ह प्रसंगामुळे हिंदू देवीदेवतांबद्दलच्या भावना दुखावल्या असून, ही धार्मिक विटंबना आहे असे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने म्हटले आहे. अभाविपकडून रात्रीच नाटक बंद पाडण्यात आले.

यावेळी थोड्या प्रमाणात मारामारी झाल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगतात. तसेच रात्री उशीरा चतुःश्रुंगी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री घडलेल्या या घटनेत शनिवारी सकाळपासूनच दोन्ही बाजूच्या राजकीय विचारधारा आणि धुरिणांबरोबरच नाट्य कलाकारांनी मोहीमा उघडल्याचे आहेत.

निश्चितच नाटकातील काही प्रसंग आक्षेपार्ह आहेत. याचा फायदा घेऊन आता दोन्ही बाजूंनी राजकारण झाल्यास विद्यार्थ्यांच्या हिताचा बळी जाण्याची शक्यता आहे. दोषींवर कारवाई व्हायला हवी पण त्याचबरोबर विद्यापीठातील सौहार्द आणि स्वातंत्र्य टिकायला हवे. अशा प्रकरणांनतर अनेक चांगले उपक्रम बंद पडत शिक्षणाच्या हितालाच तिलांजली दिली जाते. दोन्ही बाजूंनी विद्यार्थी हिताचा निर्णय घेणे गरजेचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com