

ST Unique Offer for Aspiring Candidates
Sakal
मंचर : “ज्यांना कोणत्याही पक्षाने तिकीट दिले नाही… त्यांना आम्ही तिकीट देऊ. आमच्या तिकिटाने या गावातून त्या गावात जाता येते, पण या पक्षातून त्या पक्षात नाही.” अशा उद्दीपक व मार्मिक आशयाच्या संदेशासोबत एसटी बसचा फोटो जोडलेला आहे. प्रत्येक पक्षात उमेदवारी मिळण्यासाठी स्पर्धा व पक्षांतराची रेलचेल सुरू असताना डोळ्यात अंजन घालणारा हा संदेश नेटकऱ्यांना चांगलाच भावला असून, हा व्हिडीओ–मिमक्री शैलीतील संदेश विविध व्हाट्सअॅप गटांमध्ये मोठ्या गतीने प्रसारित होत आहे. इच्छुक उमेदवारांमध्येही या संदेशाची चर्चा मनात घर घर करत असून , संदेश वाचल्यानंतर ‘अक्षरशः हास्याचे फवारे उडतात’ अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली आहे.