Lok Sabha Election 2024 : बारामतीत राजकीय पक्षांना प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळणार

यंदा बारामती लोकसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी सर्वच राजकीय पक्षांना पुरेसा अवधी मिळणार असल्याने दिलासा मिळाला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीची अधिसूचना 12 एप्रिल 2024 रोजी प्रसिध्द केली जाणार आहे.
Political parties will get enough time for campaigning in Baramati lok sabha election 2024 politics
Political parties will get enough time for campaigning in Baramati lok sabha election 2024 politics Sakal

बारामती : यंदा बारामती लोकसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी सर्वच राजकीय पक्षांना पुरेसा अवधी मिळणार असल्याने दिलासा मिळाला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीची अधिसूचना 12 एप्रिल 2024 रोजी प्रसिध्द केली जाणार आहे. त्या दिवसापासूनच उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून पुढे सात दिवस 19 एप्रिल 2024 पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.

दुस-याच दिवशी लगेचच म्हणजे 20 एप्रिल रोजी अर्जांची छाननी होणार असून 22 एप्रिल हा उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा अंतिम दिवस आहे. मतदान 7 मे रोजी होणार आहे. निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार 12 एप्रिल पासून ते थेट 5 मे पर्यंत तीन आठवडे प्रचार करता येणार आहे. दरम्यान निवडणूक तारखांची घोषणा झालेली असल्याने अगदी आजपासूनही उमेदवार गाठीभेटींसह इतर माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचू शकणार आहे.

त्या मुळे यंदा प्रचाराला जवळपास 50 दिवसांचा कालावधी सर्वच राजकीय पक्षांना मिळणार आहे. लोकसभा मतदारसंघ मोठा असतो, त्या मुळे सर्व मतदारांपर्यंत पोहोचण्याची कसरत राजकीय पक्षांना करावी लागणार आहे. भर उन्हाळ्यात निवडणूक असल्याने सकाळी उन तापेपर्यंत व संध्याकाळी उन कमी झाल्यानंतरच्या टप्प्यात सर्वांना प्रचार करावा लागणार आहे. दुपारी उन्हाची तीव्रता कमालीची असल्याने दुपारी प्रचार करता येणे अवघड आहे.

हातात पुरेसा कालावधी असल्याने बारामती लोकसभा मतदारसंघात स्टार प्रचारकांच्याही अनेक सभा होतील अशी शक्यता आता वर्तविली जाऊ लागली आहे. सोशल मिडीया प्रभावी असल्याने त्या माध्यमातूनही जोरदार प्रचार होईल, रिल्स, स्लाईड, व्हिडीओ या द्वारे यंदा प्रचार अधिक प्रभावीपणे होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com