

War of Words Between NCP and BJP After Baramati Protest
esakal
बारामती : भाजप युवा मोर्चाच्या वतीने शनिवारी (ता. 13) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर केलेल्या आंदोलनाचे राजकीय पडसाद बारामतीत उमटले. भाजपच्या या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संदीप बांदल यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला. महायुतीच्या सरकारमध्ये दोन्ही घटक पक्ष असताना भाजपच्या युवा मोर्चाच्या पदाधिका-यांनी प्रसिध्दी मिळविण्यासाठी केलेली ही स्टंटबाजी असल्याचा आरोप संदीप बांदल यांनी या बाबत केला.