

Ajit Pawar addressing party workers during his last program in Khed taluka at Varale.
Sakal
-रुपेश बुट्टेपाटील
आंबेठाण: वराळे ( ता.खेड ) येथे १९ जानेवारीला झालेला अजितदादा पवार यांचा कार्यकर्ता मेळावा हा खेड तालुक्यातील त्यांचा अखेरचा जाहीर कार्यक्रम ठरला. माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टेपाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशानिमित्त ते खेड तालुक्यात आले होते.
आजपर्यंत खेड तालुका हा पवार घराण्याच्या विचारसरणीने चाललेला तालुका आहे. सुरुवातीला शरद पवार आणि त्यानंतर राष्ट्रवादीची विभागणी झाल्यानंतर तालुक्याने कायमच अजित पवारांना साथ दिली.