कारणराजकारण : सत्याधाऱ्यांनी नाकारला पाणीप्रश्न

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 एप्रिल 2019

पुणे : पद्मावती परिसरात पाणीप्रश्न उद्भवत असल्याची तक्रार येथील नागरिक करीत असताना सत्ताधारी पक्षाच्या कार्यंकर्त्यांनी मात्र पाण्याची कोणतीही समस्या नसल्याचे सांगितले. 

पुणे : पद्मावती परिसरात पाणीप्रश्न उद्भवत असल्याची तक्रार येथील नागरिक करीत असताना सत्ताधारी पक्षाच्या कार्यंकर्त्यांनी मात्र पाण्याची कोणतीही समस्या नसल्याचे सांगितले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर #कारणराजकारण - भाग दोन ही मालिका फेसबुक लाईव्हच्या माध्यामातून 'सकाळ'ने सुरु केली आहे.  याअंतर्गत पद्मावती परिसरातील नागरिकांसाठी 'पाणी' हाच मोठा डोकेदुखीचा प्रश्न असल्याचे समोर आले. 

गेल्या 20 वर्षापासून बीआरटीच्या पुनर्विकासाचे घोंगडे भिजत असताना सुस्थिती असलेल्या रस्त्याचे सिमेंटीकरण, उड्डाणपूल अशी कामे या परिसरात केलेली आहेत, यामुळे नागरिकांमध्ये एक प्रकारचा असंतोष यावेळी पाहायला मिळाला.

पदपथ वाढवून ठेवल्यामुळे पदपथांवर दुचाकीचालक अतिक्रमण करतात. यामुळे पादचाऱ्यांच्या जीवालाही धोका निर्माण होतो आहे. अंबिल ओढा तसेच कचऱ्याचा प्रश्न देखील अग्रस्थानी आहे, या प्रश्नांवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये चर्चा चांगलीच रंगली.

 

Web Title: politician rejected water dispute in padmavati area