राजकारणातही कौशल्य लागते - बापट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

पौडरस्ता - डॉजबॉल खेळामध्ये खेळाडूला अंगावर येणारा बॉल हुकवावा लागतो, त्याचप्रमाणे राजकारणात काम करीत असताना शेकडो प्रकारचे राजकीय चेंडू आमच्या अंगावर येत असतात व आम्हास ते लागणार नाहीत, याची आम्हीदेखील काळजी घेत असतो. म्हणजेच तुमच्याप्रमाणे आमचादेखील डॉजबॉलचा गेम रोज राजकारणात सुरू असतो, असे सांगत पालकमंत्री गिरीश बापट यांनी राज्यस्तरीय सब-ज्युनिअर डॉजबॉल स्पर्धेतील विजेत्यांना पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी बक्षिसाचे वाटप केले. 

महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशन व दिलीप वेडेपाटील स्पोर्टस ॲकॅडमी यांच्या वतीने राज्यस्तरीय सब-ज्युनियर डॉजबॉल स्पर्धा (१७ वर्षांखालील मुले व मुली) दिलीप वेडेपाटील स्पोर्टस ॲकॅडमी बावधन खुर्द या ठिकाणी झाल्या. स्पर्धेचे उद्‌घाटन आमदार मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले, तर बक्षीस वितरण पालकमंत्री बापट यांच्या हस्ते करण्यात आले. 

या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील तेवीस जिल्ह्यांमधील सदतीस संघ आणि सहाशेहून अधिक खेळाडू, पंच, मार्गदर्शक, व्यवस्थापक, पदाधिकारी सहभागी झाले होते. 

या वेळी बाबूराव दोडके, राजेंद्र मागाडे, कमलाकर डोके, मिलिंद क्षीरसागर , सुजाता क्षीरसागर, नीलेश मुरकुटे, संघटनेचे महासचिव हनुमंत लुंगे, तांत्रिक समितीचे सयाजी तीर्मिके, पंच धन्यकुमार हराळ, तसेच नगरसेविका डॉ. श्रद्धा प्रभुणे-पाठक, किरण दगडे पाटील, शैलेश वेडेपाटील, राजाभाऊ जोरी, राजेंद्र बांदल, गोरख दगडे, प्रा.बाळासाहेब जेधे, सुरेश भगत, श्रीकृष्ण राळे, उमेश कांबळे, अशोक प्रभुणे, ॲड. पाचुनकर, गणेश लोखंडे, गौरव भेडसगावकर, पवन सतदेवे, कल्याणी कलावंत, अपर्णा गोरे, एकनाथ वेडेपाटील व स्पर्धेचे आयोजक नगरसेवक तथा स्थायी समितीचे सदस्य दिलीप वेडेपाटील उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव मुरकुटे यांनी केले.

विजेता संघ मुले - १) प्रथम क्रमांक - मुंबई सिटी, २) द्वितीय क्रमांक - अमरावती, ३) तृतीय क्रमांक - लातूर. 
विजेता संघ मुली - १) प्रथम क्रमांक - कोल्हापूर, २) द्वितीय क्रमांक - सांगली, ३) तृतीय क्रमांक - अमरावती

Web Title: Politics also requires skill Girish Bapat