#GarbageIssue वाघोलीत कचरा प्रश्‍नावरून राजकारण

#GarbageIssue वाघोलीत कचरा प्रश्‍नावरून राजकारण

वाघोली - कचऱ्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. या गंभीर प्रश्नावर तोडगा काढण्याऐवजी ग्रामपंचायत सदस्य राजकारण करून बैठकीला उपस्थित राहत नसतील, तर हे वाघोलीचे दुर्दैव म्हणावे लागेल, असा सूर परिसरातील नागरिक व नेटिझन्समधून निघू लागला आहे. 

वाघोलीत सध्या कचऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तो साठविण्यासाठी जागाच नसल्याने तो उचलला जात नाही. घंटागाड्याही बंद आहेत. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी ग्रामपंचायत सदस्यांच्या विशेष बैठकीचे दोन वेळा आयोजन करण्यात आले होते. मात्र, त्या वेळी अठरापैकी नऊ सदस्यांनी दांडी मारली. यामुळे या प्रश्‍नावर लोकप्रतिधिनी किती गंभीर आहेत, हे दिसून येते. यामुळे त्यांच्यावर परिसरातील नागरिकांचा रोष व्यक्त होत आहे. ग्रामपंचायत सदस्यांच्या राजकारणात कचराप्रश्न अडकला आहे. यामुळे परिसरात अनेक ठिकाणी कचरा साठल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात येऊ लागले आहे. यामुळे वाघोलीचा महापालिकेत समावेश करावा, अशी मागणी आयुक्तांकडे करणार असल्याचे शिवसेनेचे हवेली तालुका प्रमुख राजेंद्र पायगुडे यांनी सांगितले.

कचऱ्यासारख्या गंभीर समस्येवर मार्ग काढण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीला सदस्य अनुपस्थित राहून राजकारण करीत असतील, तर त्यांनी राजीनामा द्यावा. सरपंचांनी त्यांच्या अधिकारात निर्णय घेऊन हा प्रश्न सोडवावा.   
- राजेंद्र सातव, माजी उपसरपंच

वाघोतील काही ग्रामपंचायत सदस्य आपल्या जबाबदारीपासून दूर पळत आहेत. यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. कचरा उत्पन्न देतो, हेही त्यांनी लक्षात घेतले पाहिजे.
- टी. सातव, नागरिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com