पुणे जिल्ह्यातील 76 ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान 

संतोष आटोळे 
शनिवार, 26 मे 2018

पुणे जिल्ह्यातील जुन ते सप्टेंबर 2018 या कालावधीत 90 ग्रामपंचायतींचा कार्यकाळ पुर्ण होत आहे. यातील 76 ग्रामपंचायतींसाठी उद्या (27 मे) मतदान होणार आहे. मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी सोमवारी (28 मे) मतमोजनी होऊन निकाल जाहीर करण्यात येतील. जिल्ह्यातील 90 ग्रामपंचायती पैकी 12 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या तसेच सदस्य पदाच्या 834 जागांपैकी 268 सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. एकही अर्ज न दाखल आल्याने सरपंच पदाच्या 2 व सदस्य पदाच्या 78 जागा रिक्त राहिल्या आहेत. उर्वरित 76 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी मतदान होत आहे. यामध्ये सरपंच पदासाठी 226 व ग्रामपंचायत सदस्य पदाच्या 488 जागांसाठी 1160 उमदेवार निवडणुक रिंगणात आपले नशिब आजमावत आहेत.

शिर्सुफळ : पुणे जिल्ह्यातील जुन ते सप्टेंबर 2018 या कालावधीत 90 ग्रामपंचायतींचा कार्यकाळ पुर्ण होत आहे. यातील 76 ग्रामपंचायतींसाठी उद्या (27 मे) मतदान होणार आहे. मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी सोमवारी (28 मे) मतमोजनी होऊन निकाल जाहीर करण्यात येतील. जिल्ह्यातील 90 ग्रामपंचायती पैकी 12 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या तसेच सदस्य पदाच्या 834 जागांपैकी 268 सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. एकही अर्ज न दाखल आल्याने सरपंच पदाच्या 2 व सदस्य पदाच्या 78 जागा रिक्त राहिल्या आहेत. उर्वरित 76 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी मतदान होत आहे. यामध्ये सरपंच पदासाठी 226 व ग्रामपंचायत सदस्य पदाच्या 488 जागांसाठी 1160 उमदेवार निवडणुक रिंगणात आपले नशिब आजमावत आहेत.

संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रातील ग्रामस्थांनी निवडणुक आयोगाने निर्धारीत केलेल्या ओळखपत्रासह आपला मतदानाच हक्क बजवावा असे आवाहन निवडणुक आयोगाच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान सरपंच व सदस्य पदांच्या निवडणुकांसाठी गेली दहा दिवस प्रचाराचा धुराळा उडाला. रविवार सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होणार आहे. त्यानंतर सोमवार (ता.28) रोजी मतमोजनी होईल. दरम्यान प्रशासनाकडुन निवडणुकीसाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. 

बारामती तालुक्यातील 15 ग्रामपंचायतीपैकी 2 ग्रामपंचायती संपूर्ण बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित 13 ग्रामपंचायतीसाठी रविवारी मतदान पार पडणार आहे. यामध्ये सरपंचपदासाठी 38 तर सदस्य पदाच्या 88 जागांसाठी 194 उमेदवार आपले नशिब अजमावत आहेत. प्रशासनाच्या वतीने निवडणुक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. त्यांना शनिवार (ता.26) रोजी सर्व साहित्यासह मतदान केंद्रावर पाठविण्यात आले आहे. मतदान शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन प्रयत्नशिल आहे अशी माहिती तहसिलदार हनुमंत पाटील व निवासी तहसिलदार आर.सी पाटील यांनी दिली.
 

Web Title: polling for 76 gram panchayats in pune