लोणावळ्यात आता प्रदूषण, प्रवासी कर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जून 2018

लोणावळा - पर्यटकांकडून प्रदूषण व प्रवासी करवसुली करण्याच्या लोणावळा नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेतील विषयाला तब्बल दोन तासांच्या चर्चेनंतर मतदानाद्वारे मंजुरी देण्यात आली. शिवसेनेने या विषयावर विरोध कायम ठेवला.

लोणावळा - पर्यटकांकडून प्रदूषण व प्रवासी करवसुली करण्याच्या लोणावळा नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेतील विषयाला तब्बल दोन तासांच्या चर्चेनंतर मतदानाद्वारे मंजुरी देण्यात आली. शिवसेनेने या विषयावर विरोध कायम ठेवला.

भाजप, कॉंग्रेसच्या सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले, तर शिवसेनेच्या गटनेत्या शादान चौधरी, नगरसेवक शिवदास पिल्ले, माणिक मराठे, कल्पना आखाडे, सिंधू परदेशी यांनी विरोधात मतदान केले. अपक्ष नगरसेविका सेजल परमार या तटस्थ राहिल्या. नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या अनुपस्थितीत उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा झाली. चौधरी म्हणाल्या, 'प्रदूषण व प्रवासी करवसुलीचा ठेका देताना; तसेच वसुलीदरम्यान पारदर्शकता नाही. नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार आहे. करवसुलीचा ठेका रद्द करण्यात यावा, असा ठराव नगर परिषदेच्या वतीने करण्यात आला होता. ठेकेदाराने अनेकदा ठेका अर्धवट सोडला. त्यामुळे नगर परिषदेचे नुकसान झाले. पुन्हा एकदा त्याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. पुजारी म्हणाले, ""राज्यभरातील पर्यटनस्थळी प्रदूषण व प्रवासी कराची वसुली करण्यात येते; मग लोणावळ्यात का नाही? विकासकामे करण्यासाठी पैसा लागतो. नागरिकांची गैरसोय होणार नाही, गेल्या वेळी ज्या चुका झाल्या त्यात सुधारणा करण्यात येईल.''

Web Title: pollution and passenger tax municipal